मुश्रीफ फाउंडेशनकडून कागलच्या कोविड रुग्णालयांसाठी साहित्य

 

कागल:नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीने कागलमध्ये नव्याने झालेल्या 2 कोविड रुग्णालयांसाठी साहित्य देण्यात आले. केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, नगराध्यक्षा सौ माणिक माळी आणि सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी साहित्य तहसीलदार सौ शिल्पा ठोकडे यांच्याकडे दिले. कागलमध्ये नवीन तपासणी नाका व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृह अशी दोन नवीन कोविड रुग्णालय मंजूर झाली आहेत. या रुग्णालयातील रुग्णांसाठी बेडसह गाद्या, बेडशीट, चादरी, सॅनिटायझर, हॅन्डग्लोज व इतर सर्व उपयुक्त साहित्य फाउंडेशनच्यावतीने दिले. दुसऱ्या टप्प्यात जे जे साहित्य लागेल त्याचा पुरवठा फाउंडेशनच्यावतीने केला जाईल अशी, माहिती अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी दिली. प्रताप उर्फ भैय्या माने म्हणाले, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ गेले दोन महिने कोरोना संसर्गाशी समर्थपणे लढण्यासाठी सामाजिक बांधिलकी मानून सतत अग्रेसर राहिले आहेतयावेळी नगरसेवक प्रवीण काळबर, नगरसेवक नितीन दिंडे, मुख्याधिकारी पंडित पाटील, नायब तहसीलदार शिवाजीराव गवळी, आरोग्य अधिकारी नितीन कांबळे, कागल शहराध्यक्ष संजय चितारी, कागल शहर युवक अध्यक्ष सागर गुरव, मा. संग्राम गुरव, विस्तारळ अधिकारी श्री कुंभारे, हारूण मुजावर बाॅबी बालेखान,रणजीत पोवार आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!