
कोल्हापूर : येथील देवदासींना आमदार चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
लॉकडाउनच्या कालावधीत समाजातील सर्वच घटकांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले. यातील एक घटक म्हणजे देवदासी. त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप आमदार चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. सुरक्षित अंतर ठेवून झालेल्या या कार्यक्रमात पाच किलो तांदूळ आणि पाच किलो गव्हाचे वाटप केले. याचा लाभ १५० देवदासींना झाला. रविवार पेठ येथे हा कार्यक्रम झाला. यावेळी संदीप पाटील, दीपक चोरगे, राजू साठे, युवराज उलपे, संदीप पोवार यांच्यासह देवदासी उपस्थित होत्या.
Leave a Reply