
कोल्हापूर : राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार फेरीवाल्यांचे पुनर्वसन करणेच्या कार्यवाहीबाबत आज शहर फेरीवाला समितीची बैठक आयुक्त कार्यालय मिटींग हॉल येथे संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी आयुक्त पी.शिवशंकर होते.
या बैठकीस महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते संभाजी जाधव, उप-आयुक्त विजय खोराटे, शहर डीवायएसपी भरतकुमार राणे, फेरीवाले नेते मा.आर के पोवार, नंदकुमार वळंजु, दिलीप पोवार, अशोक भंडारे, अशोक रोकडे, धनाजी दळवी, किशोर घाटगे व इतर फेरीवाले नेते तसेच शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, अति.परिवहन व्यवस्थापक संजय भोसले, इस्टेट ऑफिसर प्रमोद बराले, सचीन जाधव, व इतर महापालिकेचे अधिकारी तसेच चारही विभागीय कार्यालयाचे उप-शहर अभियंता उपस्थित होते. या बैठकीमध्ये
1. विभागीय कार्यालय क्रं.1 अंतर्गत एकूण 19 ना फेरीवाले झोन मधील रस्त्यांपैकी 15 रस्त्यावरील फेरीवाल्यांचे पुर्नवसनाबाबत सहमतीने निर्णय घेणेत आला.
2. विभागीय कार्यालय क्रं.2 अंतर्गत एकूण 18 रस्ते ना फेरीवाला झोन मधील असून त्याबाबत कोणताही निर्णय झाला नाही. पुढील दि.8/2/2016 रोजी बैठक आयोजित करुन याबाबत निर्णय घेणेचे ठरले.
3. विभागीय कार्यालय क्रं.3 अंतर्गत एकूण ना फेरीवाले क्षेत्र रस्त्यांपैकी 2 रस्ते सोडून उर्वरित सर्व रस्त्यांबाबत सहमतीने निर्णय झाला.
4. विभागीय कार्यालय क्रं.4 अंतर्गत एकूण 6 ना फेरीवाले झोन रस्त्यांपैकी 2 रस्ते सोडून उर्वरीत 4 ना फेरीवाला झोन रस्तेंबाबत सहमतीने निर्णय झाला.
ज्या ना फेरीवाला झोन रस्त्यांपैकी निर्णय झालेला नाही अशा सर्व ठिकाणांचे बाबतीत दि.08/02/2016 रोजी बैठक घेऊन निर्णय घेणेचे ठरले.
Leave a Reply