
कोल्हापूर: गेल्या वर्षीच्या महाप्रलयंकारी महापुरामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्याचे फार मोठे नुकसान झाले होते सदर महापुरास ज्याप्रमाणे अतिवृष्टी हे कारण होते त्याचप्रमाणे कर्नाटक राज्यातील हिप्परगी व अलमट्टी हि दोन धरणे हे महत्त्वाचे कारण आहे.या धरणातील अतिरिक्त पाणीसाठा तसेच पावसाच्या प्रमाणात धरणातून योग्यवेळी पाण्याचा विसर्ग झाला नाही. त्यामुळे त्याच्या बॅक वॉटरचा फटका कोल्हापूर व सांगली जिल्ह्याला बसला होता. शेती पिके जनावरे तसेच घरे पडली आणि शेतकऱ्यांचे संसार उध्वस्त झाले होते.मागील वर्षी ज्याप्रमाणे महाप्रलयंकारी महापूरास तोंड द्यावे लागले तसे यावर्षी लागू नये म्हणून महाराष्ट्र व कर्नाटक राज्य यांनी आतापासूनच दोन राज्यात समन्वय साधून पाण्याच्या विसर्गाचे नियोजन करावे व पुरस्थिती होणार नाही याची दक्षता घ्यावी संदर्भातील निवेदन पालकमंत्री नामदार सतेज पाटील व जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना द्यावे अशी सूचना एन डी पाटील यांनी केली.त्यांच्या सूचनेवरून इरिगेशन फेडरेशनच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांना यासंदर्भात निवेदन दिलै.
मागील वर्षी झालेल्या महापुराच्या नुकसानीची भरपाई अध्याप सहकारी पाणीपुरवठा संस्था वैयक्तिक कृषी पंपधारक शेतकरी यांना रुपये 13. 84 कोटी महावितरणने पंचनामे केलेली रक्कम मिळालेली नाही.महापुरामुळे महावितरण कंपनीचे शंभर कोटी रुपयांचे नुकसान झाले होते महापुरानंतर शेती पंपाचा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी डिसेंबर 2019 अखेर वेळ लागला होता त्यामुळे परत त्यावेळी पाण्याअभावी शेती पिकांची नुकसान झाली होते.महाप्रलयंकारी महापुरामुळे 78 हजार हेक्टर ऊस पाण्याखाली गेला आणि पूर्णपणे कुजला होता. तो ऊस तोडण्याचे साखर कारखान्यांनी नाकारले होते. यासंदर्भात इरिगेशन फेडरेशने वरचेवर जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठका घेऊन साखर कारखान्यांना तो ऊस तोडण्यासाठी भाग पाडले होते. महापुरामुळे एकरी 10 ते 20 टन उसाचे उत्पन्न मिळाले होते. त्यामुळे ऊस लागवडीचा खर्च मागील वर्षी शेतकऱ्यांचा निघालेला नाही पूर्ण वर्षाचे पीक डोळ्यासमोर नष्ट झाल्याचे शेतकऱ्याने पाहिले आहे. या सर्वांचे कारण सांगली जिल्ह्या पासून 70 किलोमीटर अंतरावर असणारे कर्नाटक राज्यातील हिप्परगी व अलमट्टी ही दोन धरणे आहेत.
अनेक शेतकऱ्यांना अजुनही महापुराच्या काळातील झालेल्या नुकसानीचे भरपाई अद्याप मिळालेली नाही. कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील छोट्या-मोठ्या उद्योगधंदे यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.मागील वर्षा सारखी महापुराची परिस्थिती यावर्षी होऊ नये यासाठी योग्य त्या सर्व उपाययोजना कराव्यात.अशी मागणी इरिगेशन फेडरेशनच्या वतीने करण्यात आली.कर्जमाफी सह ओला दुष्काळ जाहीर करावा करावा यासंदर्भात प्रा. डॉ. एन डी पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिरोळ येथे दि.12-12-2019 रोजी पुरबाधीत शेतकऱ्यांचा मेळावा घेण्यात आला होता तसेच दिनांक 25 डिसेंबर 2019 रोजी शाहू स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर येथे शेतकऱ्यांचा मेळावा घेऊन पावसाळ्यातील खंडित कालावधीतील कृषीपंपाचे वीज बिल माफ करावे यासंबंधी शासनास सूचना केली होती. दोन्ही मेळाव्यास माजी खासदार राजू शेट्टी ,माजी आमदार उल्हासदादा पाटील, प्रताप होगाडे,अरुणआण्णा लाड हे उपस्थित होते.
दि.04 मार्च 2020 मुंबई येथे मंत्रालयात आमदार सतेज पाटील यांच्या पुढाकाराने ऊर्जामंत्री नामदार नितीन राऊत यांना भेटून इरिगेशन फेडरेशनच्या शिष्टमंडळाने पावसाळ्यातील कृषी पंपाचा वीज पुरवठा बंद असताना आलेली वीज बिले माफ करावीत. नुकसानग्रस्त कृषी पंपाच्या भरपाईसाठी 14 कोटी रुपयांची तरतूद करून सदर नुकसान भरपाई तात्काळ मिळावी अशी मागणी करण्यात आली होती.अध्याप राज्य शासनाकडून महापुर काळातील नुकसान भरपाई बाबत कोणतीच कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे महापुराचे काटेकोर नियोजन करून महापुराची परिस्थिती उद्भवणार नाही याची दक्षता घ्यावी.तरी लवकरात लवकर भरपाई मिळावी
तसेच सध्याच्या काळात आधीच कोरोनामुळे शेतकऱ्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. परत पुन्हा पुरामुळे गेल्या वर्षी सारखी परस्थिती हाऊ नये , ती कुणालाही परवडणारी नाही, शेतकऱ्यांचा उद्रेक होण्याची वाट पाहू नये.असेही निवेदनात म्हटले आहे.
निवेदन देण्यासाठी विक्रांत पाटील किणीकर व सचिव मारुती पाटील हे उपस्थित होते.
Leave a Reply