
कोल्हापूर/प्रतिनिधी: कोरोना या महामारी च्या पार्श्वभूमीवर लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जाणाऱ्या प्रसार माध्यमातील प्रतिनिधीदेखील अत्यावश्यक सेवेतील नागरिकांप्रमाणे दिवसरात्र मेहनत घेत आहेत. पत्रकार आपला जीव धोक्यात टाकून अहोरात्र वृत्तांकन करत आहेत. आपले कर्तव्य पार पाडत आहेत.पोलीस, सरकारी कर्मचारी, डॉक्टर, आरोग्य अधिकारी, नर्सेस यांना कोरोना योद्धे म्हटले जाते आहे पण कोरोना च्या इतमभूत बातम्या देणारे पत्रकारांचा विचार कुठल्याही प्रकारे केला जात नाही.पण हा विचार कोल्हापूर युवा पत्रकार संघ कोल्हापूर यांनी केला. शहरातील पत्रकारांना दैनंदिन जीवनात लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून कोल्हापुरातील पत्रकारांना दिलासा दिला आहे.काही प्रसार माध्यमात आर्थिक अडचणींमुळे पगारही दिलेला नाही. अश्यावेळी या पत्रकाराने आपले कुटुंब कसे चालवायचे?हा प्रश्न युवा पत्रकार संघाने सोडवला. यावेळी मास्क बांधून व सोशल डिस्टनसिंगचे सर्व नियम पाळून संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे, राज्य उपाध्यक्ष सुशांत पोवार, सचिव शरद माळी, खजानीस बाबुराव वळवडे, दिनेश चोरगे, जावेद देवडी, नियाज जमादार, राजेंद्र सूर्यवंशी, कमलाकर सारंग, रवी कोल्हटकर, मुबारक अत्तार, आदींच्या उपस्थितीत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. सध्या आर्थिक गणित कोलमडले आहे म्हणून आमच्या पत्रकारांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन कोल्हापूर युवा पत्रकार संघाच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे. ‘स्वावलंबन स्विकारून निर्भीड पत्रकार बना’ अश्या पत्रकारांच्या पाठीशी युवा पत्रकार संघ नेहमीच उभा असेल अशी ग्वाही संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे यांनी दिली.असंख्य पत्रकारांनी याचा लाभ घेतला.
Leave a Reply