
कोल्हापूर: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्रात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आम.चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली “माझे आंगण माझे रणांगण” या घोषणेचा आधार घेऊन घरा-घरामध्ये आंदोलन छेडण्यात आले.प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्याशी सातत्याने संपर्क ठेऊन परिस्थिती आवाक्या बाहेर जाऊ नये यासाठी जरूर त्या उपाययोजना राबविण्यासाठी अनेक उपाययोजना राबविल्या परंतु महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने या कठीण काळात देखील सर्व सामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळून अतिशय गलीच्छ राजकारण केले. स्वतःचे मुख्यमंत्री पद शाबुत ठेवण्यासाठी विविध व्यूहरचना रचणाऱ्या उद्धवजींना महाराष्ट्रातील बिघडत चाललेल्या आरोग्याबाबत काही ठोस निर्णय घ्यावेत असे अजिबात वाटले नाही. महाराष्ट्रामध्ये गुणाकार पद्धतीने कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना महाराष्ट्रातील इतर मंत्री काय करत आहेत हे समजून येत नाही. केंद्र सरकारने २० लाख कोटी रुपयांचे आर्थीक पॅकेज घोषीत केले असताना त्यातील जास्तीचा वाटा आपल्या महाराष्ट्र राज्याकरीता मिळवण्याचे सोडून सरकार मध्ये असणारे मंत्रीमंडळ व प्रशासन का झोपी गेले आहे ? हे अनाकलनीय आहे.आपल्या शेजारच्या इतर राज्यांनी ह्या परिस्थितीला तोंड देत असताना सर्व सामान्य नागरिकांसाठी, शेतकऱ्यांसाठी, रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी, परीट समाजासाठी, नाभिक समाजासाठी तसेच समाजातील इतर सर्व गोर-गरीब जनतेसाठी मोठी आर्थिक अनुदानाची योजना लागू केली. ९ मार्च रोजी महाराष्ट्रात पहिला कोरोना रुग्ण आढळला त्यावेळी केरळ राज्याची संख्या जेमतेम बरोबरीची असताना आज मात्र महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या ४० हजारच्यावर गेली आहे याचा अर्थ महाराष्ट्राचे हे सरकार कोरोनाचा फैलाव रोखण्यात अपयशी ठरले आहे. गेली दोन महिने भाजपाने याबाबत सहकार्य दर्शवले परंतु यावर सरकारला योग्य नियंत्रण ठेवता येईना म्हणून नाईलाजास्तव आज आवाज उठवणे भाग पडले आहे.असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.वर नमूद केलेल्या समाज घटकांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचे अनुदान त्यांच्या खात्यावर जमा करण्याचे घोषीत केले परंतु महाराष्ट्रातील निष्क्रिय सरकारने मात्र केंद्र सरकारच्या नावाने गळा काढण्यातच धन्यता मानली. या अपयशी सरकारने आता तरी जागे होऊन आपल्या जबाबदारीचे भान ओळखून या संकटावर मात करण्यासाठी प्रथमत: स्वत: जागे होऊन सुस्त झालेल्या प्रशासनाला गतिमान करावे अशी विंनती त्यांनी यावेळी केली.
Leave a Reply