
कोल्हापूर:मेंढपाळ धनगर समाजास टाळेबंदी मधून वगळण्याची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये आ. ऋतुराज पाटील यांनी केली. महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे सर्व मंत्री, खासदार आणि आमदार यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी, कोल्हापूर दक्षिण मतदार संघामध्ये आणि एकूण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष करत असलेल्या मदत कार्याची सविस्तर माहिती आ. ऋतुराज पाटील यांनी दिली तसेच त्यांनी खालील प्रमुख मागण्या या वेळी ना. बाळासाहेब थोरात यांच्या कडे केल्या. तमाशा, बँड बँजो वाले आदी कलाकारांना राज्य शासन म्हणून आर्थिक मदत मिळावी. घर मोलकरीण, रिक्षा – टॅक्सिवाले, फेरीवाले, हातगाडीवाले आदी दिवसभर कष्ट केल्यावरच ज्यांचे घर चालते अशा सर्व घटकांना गरज आहे.कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुम ५ लाख धनगर बांधव आहेत.सध्याच्या लॉकडाऊनमुळे मेंढपाळ धनगर समाजाच्या परिस्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन त्यांना आंतरजिल्हा प्रवास करण्याची परवानगी मिळावी.
Leave a Reply