
सोनी सबवरील मालिका ‘मॅडम सर‘ला नाट्यमय वळण मिळणार आहे. महिला पोलिस थानाची प्रमुख प्रेरणास्रोत एस.एच.ओ. हसीना मल्लिकचे आगामी एपिसोड्समध्ये निलंबन होणार आहे. यंदाच्या वर्षाच्या सुरूवातीला ‘कुछ बात है क्यूंकी जजबात है‘ टॅगलाइनसह सोनी सबने सुरू केलेली मालिका ‘मॅडम सर‘चार डायनॅमिक महिला पोलिस अधिका-यांच्या दृष्टिकोनातून सामाजिक समस्यांचे निराकरण करते.हसीना मल्लिकचा संस्कृती रक्षा दलाचा अत्यंत शक्तिशाली व श्रीमंत प्रमुख अंगद आचार्यशी आमनासामना होतो. अंगदची विचारसरणी व विश्वास शक्तिशाली असण्यापलीकडील असतात. तो तरूण जोडप्यांनी एकमेकांसोबत वेळ व्यतित करण्याच्या विरोधात असतो. अंगद स्थितींशी सामना करण्यासाठी त्याचे पद व प्रभावाचा उपयोग करण्यास घाबरत नाही. पण तो महिला दबंग करिष्माशी (युक्ती कपूर) आमनासामना करताना स्थितीला नाट्यमय वळण मिळते.कथा पुढे सरकत जात प्रेक्षकांना करिष्मा व अंगदमधील प्रखर आमनासामना पाहायला मिळेल. ज्यामुळे एस.एस.ओ. हसीनावर(गुल्की जोशी)तिची नोकरी गमावण्याची नामुष्की येणार आहे. करिष्मा व अंगद यांच्यामधील आमनासामना हसीनाला कशाप्रकारे संकटात टाकतो? हसीनाची टीम यावेळी तिच्या मदतीसाठी धावून येईल का, अंगदची शक्ती मॅडम सरपेक्षा वरचढ आहे का? हसीनाच्या निलंबनामुळे लखनौच्या महिला पोलिस थानाचे भवितव्य काय असेल? प्रेक्षकांना आगामी एपिसोड्समध्ये या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. आगामी एपिसोड्स उत्सुकता व रहस्यांनी भरलेले आहेत.हसीना मल्लिकची भूमिका साकारणारी गुल्की जोशी म्हणाली,”मनापासून पोलिस कर्तव्य बजावण्यावर प्रबळ विश्वास असलेली हसीना मल्लिक, एस.एच.ओ. (स्टेशन हाऊस ऑफिसर) ही हुशार व जिद्दी महिला आहे. तिचा तिच्या पोलिस कर्तव्यामध्ये संवेदनशीलता आणण्यावर विश्वास आहे. हसीना लवकरच तिच्या टीमसाठी प्रबळ निर्णय घेणार आहे. अंगदचा प्रभाव व सामर्थ्यापुढे हसीनाला महिला पोलिस थानामधील तिचे पद गमवावे लागणार आहे. मी फक्त सोनी सबवर सादर केली जाणारी मालिका ‘मॅडम सर‘च्या नवीन एपिसोड्सबाबत प्रेक्षकांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे. म्हणून मी आमच्या सर्व चाहत्यांना सोनी सब पाहण्याचे आणि आमच्या मालिकेमधील नवीन नाट्यमय उलगडा पाहण्याचा आनंद घेण्याचे आवाहन करते.”अंगद आचार्यची भूमिका साकारणारा सुदेश बेरी म्हणाला,”मला सोनी सबवरील मालिका ‘मॅडम सर‘चा भाग असण्याचा आनंद होत आहे. माझ्या मते, प्रत्येक स्थिती नाण्याप्रमाणे आहे. सर्व महिला पोलिस अधिकारी एका बाजूला आहेत आणि माझी भूमिका दुस-या बाजूला आहे. माझी भूमिका अंगद हा अत्यंत शक्तिशाली व श्रीमंत आहे. पण अंगदची विचारसरणी व विश्वास अत्यंत कठोर आहे. तो नीडर आहे आणि त्याला किंवा त्याच्या विश्वासांना धोका निर्माण करणा-या स्थितींचा सामना करताना त्याचे पद व प्रभावाचा वापर करण्यास घाबरत नाही. मी ही भूमिका साकारण्याचा आनंद घेत आहे, कारण माझ्यासाठी अभिनय हा माझा व्यवसाय असण्यासोबत माझा विश्वास आहे. म्हणून मी अगदी निष्ठेने अभिनय सादर करतो. मी या भूमिकेमध्ये पूर्णपणे सामावून जाण्यासाठी उत्सुक आहे. माझ्या मते, हा अत्यंत उत्साहवर्धक प्रवास असेल.”
Leave a Reply