
विवान व नकाबपोश पुन्हा एकदा दुविधांमध्ये सापडले आहेत. तिम्नसाच्या (पवित्रा पुनिया) पृथ्वीला गोठवण्याच्या दुष्ट योजनेमुळे विवानची (वंश सयानी) अलौकिक शक्तीची ओळख उघडकीस येण्याचा धोका निर्माण झाला आहे. सोनी सबवरील मालिका ‘बालवीर रिटर्न्स‘ प्रेक्षकांना रोमांचपूर्ण अनुभव देण्यास सज्ज आहे. त्यांचा लाडका सुपरहिरो बालवीर आणि नकाबपोश (देव जोशी) आणखी एका भयानक संघर्षाचा सामना करणार आहेत.नकाबपोशची खरी ओळख उघडकीस आणण्याच्या प्रयत्नामध्ये तिम्नसा वातावरण इतके थंड करते की सर्वकाही बर्फामध्ये बदलू लागते. नकाबपोश तिम्नसाला ठार करू शकणारे शस्त्र शोधण्याच्या उद्देशाने सुगावे शोधण्याच्या मिशनवर आहे. ज्यामुळे विवानला स्वत:हून या लढ्याचा सामना करावा लागणार आहे.समस्येचे मूळ कारण शोधण्यासाठी निघून जाण्यापूर्वी विवान डूबाडूबाला (श्रीधर वत्सर)स्वत:च्यात्याच्या रूपामध्ये बदलतो. ज्यामुळे तो घरी राहिल आणि त्याची आई करूणा व त्याच्या कुटुंबाला संशय येणार नाही.नकाबपोश व विवान लढ्यासाठी समोर येत नाहीत, तेव्हा संशयित तिम्नसा अस्वस्थ होऊन जाते. कालांतराने तिला समजते की डूबाडूबाने विवानचे रूप घेतले आहे. ती डूबाडूबाला घाबरवत सांगते की, ते तिच्यासमोर आले नाहीत, तर ती त्याचे कुटुंब व संपूर्ण भारत नगरसमोर विवानची बालवीर म्हणून खरी ओळख उघडकीस आणेल. वेळ निघून जात असते आणि पृथ्वी देखील गोठून जात असते.विवान कशाची निवड करेल? स्वत:ची खरी ओळख उघडकीस येण्यापासून थांबवेल की जगाला गोठून जाण्यापासून वाचवेल?तिम्नसाची भूमिका साकारणारी पवित्रा पुनिया म्हणाली,”तिम्नसा ही ‘बालवीर रिटर्न्स‘मधील दुष्ट मास्टरमाइण्ड आहे. तिला अजूनही नकाबपोश कोण आहे हे समजलेले नाही. नकाबपोशचा पराभव करण्याच्या प्रयत्नामध्ये तिम्नसाने योजना आखली आहे, ज्यामध्ये बालवीरचा किंवा नकाबपोशचा पराभव होऊ शकतो. हे द्विधारी तलवारीसारखे आहे, जेथे त्यांचा एका किंवा दुस-या पद्धतीने पराभव होणार आहे. आगामी एपिसोड्ससाठी शूटिंग करताना खूप धमाल आली. मला खात्री आहे की, आमचे प्रेक्षक व चाहते हे एपिसोड्स पाहण्याचा आनंद घेतील.”
Leave a Reply