
कोल्हापूर : भारतातील व्यावसायिक वाहन निर्मिती क्षेत्रातील आघाडीच्या व हिंदुजा उद्योगसमुहातील दिग्गज अशा अशोक लेलॅंड कंपनीने आपल्या ‘एव्हीटीआर’ या ‘मॉड्युलर ट्रक श्रेणी’तील, ‘आय-जेन6 बीएस-6’ तंत्रज्ञानाने युक्त, अशा 1350 हून अधिक वाहनांचे वितरण देशभरात केले आहे. आज कोल्हापुरात ‘एव्हीटीआर’ सादर करण्यात आला व येथील ग्राहकांना त्याचे वितरण करण्यात आले. राजेश मोटर्स यांच्या वतीने हा वितरण सोहळा पार पडला. या प्रसंगी ‘अशोक लेलॅंड’चे सीओओ अनुज कठुरिया, तसेच ‘राजेश मोटर्स’चे सी. एच. शहा हे उपस्थित होते. यावेळी ‘एव्हीटीआर’चे वितरण ग्राहकांना व्हर्च्युअल पद्धतीने झाले.‘अशोक लेलॅंड’चे सीओओ अनुज कठुरिया यावेळी म्हणाले, ‘’आमच्या एव्हीटीआर ट्रक्समधून ग्राहकांना अत्याधुनिक तंत्रज्ञान व नाविन्य मिळते. आपली अर्थव्यवस्था आता सुरळीत होऊ लागली असून व्यवहारदेखील सामान्य स्तरावर होऊ लागले आहेत. अशा वेळी हे नवीन ट्रक मालवाहतुकीमध्ये मोलाची भूमिका बजावतील. सध्या पैसे वाचविण्यास मोठेच महत्त्व आले असल्याने, ट्रकची गुणवत्ता व त्याच्या देखरेखीचा कमी खर्च या दृष्टीने या ट्रकच्या मालकीहक्काचे एकूण मूल्य हे मापदंड ठरले आहे. विजयवाडा येथील एएमपीएल या आमच्या विश्वासू भागीदारामुळे व्यवसायवाढीचे उद्दिष्ट ठेवणाऱ्या आमच्या ग्राहकांची संख्या वाढण्यास मदत होत आहे.’’‘राजेश मोटर्स’चे सी. एच. शहा म्हणाले, “अशोक लेलँड हा ब्रँड मजबूती आणि विश्वासार्हता यांसाठी ओळखला जातो. नवीन एव्हीटीआर श्रेणी सादर करून कंपनीने आपल्या वाहनांमध्ये एका नवीन मापदंड घालून दिला आहे. आपल्या विशिष्ट गरजांकरीता हवे तसे मॉडेल मिळण्यासाठी ग्राहकाला यामध्ये अनेकविध पर्याय उपलब्ध आहेत. याचबरोबर अत्याधुनिक ‘आय-जेन6’ तंत्रज्ञानामुळे एव्हीटीआर ट्रक खरेदीदारांसाठी प्राधान्याची निवड बनते. जास्तीत जास्त ग्राहकांच्या व्यावसायिक गरजा भागवण्याकरीता या ट्रकमध्ये गुंतवणूकीचे मूल्य उपलब्ध आहे, याची आम्ही खात्री देऊ शकतो. त्यामुळे ग्राहकांना आपला व्यवसाय व नफा वाढविण्यात मदत होईल.”
Leave a Reply