डेसरेम या ब्रँड नावाने मायलन सुरु करीत आहे भारतात रेमडेसिवीरचा पुरवठा

 

वाढत्या कोरोनाव्हायरस २०१९ (कोविड-१९)च्या साथीत पूर्ण न होऊ शकलेल्या गरजा भागवण्यासाठी मायलन या जागतिक फार्मास्युटिकल कंपनीने आज, डेसरेम या ब्रँड नावाने रेमडेसिवीर भारतात व्यावसायिकरीत्या उपलब्ध करुन देण्याची घोषणा केली. ज्यांना कोविड-१९ असल्याचा संशय आहे किंवा प्रयोगशाळेतून पुष्टी झाली आहे अशा आणि आजाराच्या गंभीर लक्षणांमुळे रुग्णालयात दाखल झालेल्या बाल आणि प्रौढ यांच्या उपचारासाठी हे औषध वापरण्यास मान्यता आहे. कंपनीने २४/७ मदतवाहिनीही सुरु केली असून तिथे रेमडेसिवीरविषयी आणि त्याच्या उपलब्धतेविषयी माहिती रुग्ण आणि आरोग्यसेवादात्यांना मिळेल.मायलनने जेनेरिक रेमडेसिवीर डेसरेम पहिली तुकडी आणली असून आणि या औषधाच्या वाढत्या मागणीनुसार देशभारत त्याचा पुरवठाही वाढता ठेवणार आहे. भारतात, रुग्ण आणि आरोग्यदेवा प्रदाता डेसरेम च्या उपलब्धतेविषयीची माहिती मायलनच्या २४/७ राष्ट्रीय मदतवाहिनी क्रमांक, +९१.७८२९९.८००६६ वरुन घेऊ शकतात.मायलन आपल्या बंगळुरुमधील अद्ययावत सुविधेत डेसरेम उत्पादन करेल, जे भारतातील आणि रेमेडेसिवीरचे व्यापारीकरण करण्याची जीलीडनी मायलनला परवाना दिला आहे त्या इतर निर्यात बाजारपेठांच मागणीही पूर्ण करेल. मायलन आणि गिलाद दरम्यान पूर्वी जाहीर केलेला करार हा दोन्ही संस्थांमध्ये भारत आणि जगातील सार्वजनिक आरोग्याच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर तोडगा काढण्याच्या दीर्घकालीन इतिहासाचा एक भाग आहे, ज्याची सुरुवात उच्च गुणवत्तेच्यापरवडणार्‍या एचआयव्ही / एड्स अँटीरेट्रोव्हायरल्स उपलब्धतेपासून झाली आणि आता कोविड -१९ उपचारांचा समावेश करण्यासाठी भागीदारी वाढवित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!