आमिर दळवीचे फराजच्‍या भूमिकेत पुनरागमन

 

सोनी सबवरील मालिका अलाद्दिन: नाम तो सुना होगाच्‍या जादुई विश्‍वामध्‍ये जफरचा जुळा भाऊ फराजचा प्रवेश होणार आहे. या काल्‍पनिक मालिकेमध्‍ये नुकतेच रोमहर्षक वळण पाहायला मिळाले आहे, जेथे दुष्‍ट मल्लिका अलाद्दिनला तिचे दुष्‍ट काम करण्‍यास भाग पाडण्‍यासाठी अम्‍मीला जिनमध्‍ये बदलते.आईला मल्लिकाची गुलाम बनलेले पाहून अलाद्दिनच्‍या जीवनात संकटाचा डोंगर उभा राहतो. सोबतच जफरसारखाच दिसणारा एक व्‍यक्‍ती बगदादमध्‍ये आला आहे. अलाद्दिन व जिनी ऑफ रिंग मृत झालेल्‍या जफरला जिवंत पाहून गोंधळून जातात. कठोर प्रश्‍नोत्तरांच्‍या शृंखलेमध्‍ये फराज अलाद्दिनला त्‍याचे वंशज दाखवत त्‍याची विश्‍वसनीयता सिद्ध करतो.फराज सांगतो की तो जफरचा जुळा भाऊ आहे, पण त्‍याच्‍यासारखा दुष्‍ट नाही. जफरने त्‍याला त्‍याच्‍या जीवनाच्‍या सुरूवातीच्‍या टप्‍प्‍यामध्‍ये तुरूंगामध्‍ये डांबले होते आणि त्‍याने बहुतेक काळ तुरूंगामध्‍येच व्‍यतित केला होता. जफरच्‍या मृत्‍यूनंतर त्‍याला तुरूंगामधून सोडण्‍यात आले. दयाळू असलेला फराज मल्लिकाबाबत अधिक जाणून घेण्‍याची इच्‍छा व्‍यक्‍त करतो. त्‍याने मोठे होत असताना त्‍याच्‍या जादूगार आईकडून तिच्‍याबाबत ऐकले होते. मल्लिकाचे पुनरागमन आणि अलाद्दिनच्‍या दुविधेबाबत समजल्‍यानंतर फराज त्‍याला त्‍याच्‍या मिशनमध्‍ये मदत करण्‍याचे ठरवतो.अलाद्दिन मल्लिकाचा पराभव करण्‍यासाठी फराजसोबत हातमिळवणी करेल का? फराजच्‍या येण्‍यामागे काही छुपे ध्‍येय आहे का?फराजची भूमिका साकारणारा आमिर दळवी म्‍हणाला,”मी दीर्घकाळापर्यंत जफरची नकारात्‍मक भूमिका साकारल्‍यानंतर आता फराजची भूमिका साकारणार आहे. फराजसारखी भूमिका साकारणे हा एक नवीन बदल आहे. फराजची भूमिका जफरच्‍या तुलनेत अत्‍यंत सकारात्‍मक व विश्‍वसनीय आहे. त्‍याचा लुक विलक्षण व आनंदी व्‍यक्तिमत्त्वासह आकर्षक आहे. त्‍याच्‍या प्रवेशामुळे आगामी साहसी कृत्‍ये अधिक रोमांचक बनणार आहेत. पण मोठा प्रश्‍न असा आहे की अलाद्दिन त्‍याच्‍यावर विश्‍वास ठेवेल का? जाणण्‍यासाठी मालिका पाहत राहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!