
मल्लिकाच्या (देबिना बॅनर्जी) खंजर (सुरा) साठी शोध सुरू झाला आहे. अलाद्दिन (सिद्धार्थ निगम) आणखी एका साहसी शोधावर निघाला आहे. पण हा फक्त शोध नसून एक प्रवास आहे, जो मल्लिकाच्या गुलामगिरीमध्ये असलेल्या अम्मीचे (स्मिता बंसल) भविष्य ठरवणार आहे. सोनी सबवरील मालिका ‘अलाद्दिन: नाम तो सुना होगा‘ रोमांचक वळण घेणार आहे, जेथे अलाद्दिन व त्याच्या टोळीसमोर नवीन आव्हाने असणार आहेत. प्रेक्षकांनी रोमहर्षक ट्विस्ट्स व वळण पाहण्यासाठी सज्ज राहा, कारण मालिका ‘अलाद्दिन: नाम तो सुना होगा‘मध्ये स्थिती अधिक आव्हानात्मक व रहस्यमय बनणार आहे.फराज (आमिर दळवी) अलाद्दिन व जिनी ऑफ दि रिंग (प्रनीत भट्ट) यांना त्याच्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवण्यास भाग पाडतो. अलाद्दिन फराजला सर्वांसमोर सादर करण्याचे ठरवतो आणि त्याच्या विश्वसनीयतेची खात्री देतो. त्यानंतर अलाद्दिन मल्लिकाची मागणी मान्य करतो आणि घोषणा करतो की तो परतल्यानंतर मल्लिका अम्मीला पुन्हा मानवी रूपात आणणार असेल तरच जादुई खंजर शोधून आणेल.फराजच्या मदतीने अलाद्दिन, जिनी ऑफ दि रिंग व फराज खंजरचा शोध घेण्यासाठी जादुई झुमता जंगलकडे त्यांचा प्रवास सुरू करतात. त्यांच्या मार्गामध्ये अलाद्दिनचा एका गुफेच्या आत विशाल वेअरवोल्फशी सामना होतो. वेअरवोल्फच्या तावडीतून सुटका करण्याचा प्रयत्न करत असताना त्याच्या शरीरावर वेअरवोल्फच्या नखांमुळे जखमा होतात. जिनी ऑफ दि रिंगला गुफेमध्ये अलाद्दिन सापडतो. पण तो पाहतो की, अलाद्दिन आता मानव राहिला नसून भयानक वेअरवोल्फमध्ये बदलला आहे आणि त्याच्यावर हल्ला करणार आहे.जिनी ऑफ दि रिंग अलाद्दिनला पुन्हा मानवी रूपात कशाप्रकारे आणेल? तो यशस्वी ठरेल का?
Leave a Reply