‘भाखरवडी’मध्‍ये कृष्‍णाचा वाढदिवस साजरा करण्‍यासाठी ठक्‍कर व गोखले कुटुंबांमध्‍ये चढाओढ

 

गोखले व ठक्‍कर कुटुंबांचा नातू कृष्‍णाचा वाढदिवस येत असताना त्‍यांच्‍यामधील भांडणाला नवीन वळण मिळणार आहे. सोनी सबवरील जीवनाचे सार दाखवणारी मालिका भाखरवडी लवकरच त्‍यांचा सर्वात लहान सदस्‍य क्रिश ऊर्फ कृष्‍णाचा वाढदिवस साजरा करणार आहे. बालकलाकार हरमिंदर सिंगने कृष्‍णाची भूमिका साकारली आहे. आगामी एपिसोड्समध्‍ये कुटुंबांना या वाढदिवसासाठी तयारी करताना पाहायला मिळण्‍यासोबत कृष्‍णाचा वाढदिवस प्रथम कोण साजरा करणार यासंदर्भात या कुटुंबांमधील भांडण देखील पाहायला मिळणार आहे. ७ वर्षाच्‍या काळझेपनंतर अभिषेक (अक्षय केळकर) आणि गायत्री (अक्षिता मुदगल) यांचा मुलगा कृष्‍णा घरी बागडताना दिसतो आहे. प्रेक्षकांनी आतापर्यंत अभिषेक व गायत्रीच्‍या सुंदर प्रेमकथेचा आनंद घेतला आहे. मालिकेच्‍या काळझेपनंतर या जोडप्‍यामधील नाते बदलले आहे.दोन्‍ही कुटुंबांमधील नाते तणावपूर्ण असले तरी कृष्‍णासाठी ते त्‍यांच्‍यामध्‍ये आनंदमय संबंध असल्‍याचे नाटक करतात आणि मुलाचे प्रेम व काळजीसह संगोपन करतात.दुसरीकडे कुटुंबांमधील भांडण माहित नसलेला कृष्‍णा बालपणीच्‍या जीवनाचा पुरेपूर आनंद घेत आहे. येणा-या वाढदिवसाबाबत उत्‍साहित असलेला तो त्‍याच्‍या कुटुंबांसोबत वाढदिवस साजरा करण्‍यासाठी खूपच उत्‍सुक आहे. पण कृष्‍णाला माहित नाही की, त्‍याचा वाढदिवस ठक्‍कर व गोखले कुटुंबांमध्‍ये एका संघर्षामध्‍ये बदलला आहे. दोन्‍ही कुटुंबांची कृष्‍णाने प्रथम त्‍यांच्‍यासोबत केक कापण्‍याची इच्‍छा आहे. एकमेकांना हरवण्‍याच्‍या प्रयत्‍नामध्‍ये कुटुंबांनी क्रिश त्‍यांच्‍यासोबत वाढदिवस साजरा करण्‍यासाठी त्‍यांची योजना आखण्‍यास सुरूवात केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!