अवयवांची तस्करी करणारे रॅकेट उघडण्‍यासाठी ‘मॅडम सर’ टीम बनली गुप्‍तहेर  

 

काळ झपाट्याने पुढे सरकत आहे! सोनी सबवरील मॅडम मल्लिक व तिच्‍या टीमने एका नवीन आव्‍हानाचा सामना केला आहे. मालिका ‘मॅडम सर’च्‍या आगामी एपिसोड्समध्‍ये प्रेक्षकांना एक रोमांचकारी केस पाहायला मिळणार आहे. लहान मुलगी झोयाचा गंभीर आजार अवयवांची तस्करी करणा-या दुष्‍ट रॅकेटचा उलगडा करतो.हसीनाचे निलंबन रद्द झाल्‍यानंतर हसीना (गुल्‍की जोशी) आणि करिष्‍मा (युक्‍ती कपूर) थानाच्‍या बाहेर वादविवाद करत असतात. थानाच्‍या बाहेरून जात असलेली एक लहान मुलगी त्‍यांचा वादविवाद पाहते आणि ती त्‍यांच्‍यावर हसण्‍यास सुरूवात करते. या मुलीचे नाव झोया असते. ती हसीना व गुल्‍कीला पोलिसांच्‍या पोशाखामध्‍ये पाहिल्‍यानंतर भविष्‍यात पोलिस अधिकारी बनण्‍याची इच्‍छा व्‍यक्‍त करते. करिष्‍मा झोयाला थाना दाखवण्‍याचे ठरवते. मुलगी महिला पोलिस थानामध्‍ये प्रवेश करताच बेशुद्ध होते. पोलिस अधिकारी मुलीला जवळच्‍या हॉस्पिटलमध्‍ये घेऊन जातात. त्‍यांना समजते की, मुलीचे मूत्रपिंड निकामी झाले आहे आणि तिच्‍यावर त्‍वरित प्रत्‍यारोपण उपचार करण्‍याची गरज आहे. झोयाचे वडिल त्‍यांचे एक मूत्रपिंड दान करण्‍यास तयार होतात. पण त्‍यांच्‍या नकळत त्‍यांचे एक मूत्रपिंड काढून घेण्‍यात आल्‍याचे त्‍यांना माहित नसते. बेकायदेशीररित्‍या अवयव काढून घेण्‍याची गंभीर केस मॅडम सरसमोर आहे आणि त्‍या या दुष्‍ट रॅकेटचा उलगडा करण्‍याचे ठरवतात.गुन्‍हेगारांना रंगेहाथ पकडण्‍याच्‍या उद्देशाने हसीना अवयवांचा व्‍यापार करणा-या या रॅकेटमागील सत्‍य जाणून घेण्‍यासाठी तिच्‍या टीमला एका गुप्‍त मिशनवर पाठवते. यादरम्‍यान झोयाची स्थिती खालावत जाते आणि ती जीवन-मृत्‍यूशी लढा देते.हसीना व टीम रॅकेटचा उलगडा करत लहान झोयाचे जीवन वाचवण्‍यामध्‍ये यशस्‍वी होतील का?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!