
सोनी सबवरील मालिका ‘मॅडम सर‘मध्ये बालविवाहाची धक्कादायक केस पाहायला मिळणार आहे. यंदाच्या वर्षाच्या सुरूवातीला ‘कुछ बात है क्यूंकी जजबात है‘ टॅगलाइनसह सुरू करण्यात आलेली मालिका ‘मॅडम सर‘ चार डायनॅमिक महिला पोलिस अधिका-यांच्या दृष्टिकोनातून सामाजिक समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करते. आगामी एपिसोड्समध्ये प्रेक्षकांना कॉन्स्टेबल चीताचा (पियांशू सिंग) विवाह पाहायला मिळणार आहे. यामधून अल्पवयीन मुलगी लताच्या विवाहाची भयानक स्थिती उघडकीस येणार आहे.कॉन्स्टेबल चीतावर त्याची आई सतत विवाह करण्याचा दबाव टाकत असते. तो लता नावाच्या मुलीला भेटण्यास होकार देतो. पण चीता विवाहाला नकार देतो, कारण त्याचे संतोषवर (भाविका शर्मा) प्रेम असते आणि तिच्यासोबत विवाह करण्याची इच्छा असते. दुसरीकडे हसीनाला (गुल्की जोशी) शहरामध्ये होत असलेल्या बालविवाहाबाबत समजते आणि ती हा गुन्हा थांबवण्याचे ठरवते. कालांतराने हसीना व टीमला समजते की चीता ज्या मुलीला भेटला, ती देखील अल्पवयीन आहे.मनामध्ये डावपेच रचत हसीना चीताला लतासोबत विवाह करण्यासाठी होकार देण्यास सांगते, ज्यामुळे गुन्हेगारांना रंगेहाथ पकडता येईल. विवाहाची सर्व तयारी केल्यानंतर हसीना, करिष्मा (युक्ती कपूर),संतोष आणि पुष्पा (सोनाली नाईक) चीताचे नातेवाईक बनून विवाहाला उपस्थित राहतात. यादरम्यान हसीना लताला कबूली देण्यास सांगते की, ती अल्पवयीन आहे आणि हा विवाह तिच्या इच्छेविरूद्ध केला जात आहे. पण त्याचवेळी लताचे वडिल खोलीमध्ये येतात.हसीना वेळेत लताला समजवण्यामध्ये यशस्वी होईल का? हसीना बालविवाहाच्या या प्राचीन भयानक रूढीला कशाप्रकारे थांबवेल?
Leave a Reply