
मल्लिकाच्या (देबिना बॅनर्जी) खंजरच्या (सुरा) तुकड्यांच्या शोधामध्ये असलेला अलाद्दिन (सिद्धार्थ निगम) नवीन विश्वामध्ये पोहोचला आहे. सोनी सबवरील मालिका ‘अलाद्दिन: नाम तो सुना होगा’ने धक्कादायक वळण घेतले आहे. खंजरच्या दुस-या तुकड्याची रक्षणकर्ता राजकुमारी तमन्नाने (आराधना शर्मा) अलाद्दिनला एका मांजरामध्ये बदलले आहे. प्रेक्षकांनी रोमहर्षक ट्विस्ट्स पाहण्यासाठी सज्ज राहा, जेथे मालिका ‘अलाद्दिन: नाम तो सुना होगा’मधील स्थिती अधिक आव्हानात्मक व रहस्यमय बनणार आहे.मल्लिकाच्या खंजरचा पहिला तुकडा यशस्वीरित्या संपादित केल्यानंतर अलाद्दिन व टीम पुढील गंतव्याकडे निघतात. हे गंतव्य राजकुमारी तमन्ना व तिचा रहस्यमय राजवाडा आहे. अलाद्दिन राजवाड्यामध्ये पोहोचल्यानंतर सिंहासनावर एका मांजरीला बसलेली पाहतो, जी क्षणात सुंदर राजकुमारीमध्ये बदलते. खंजरचा पुढील तुकडा मिळवण्यामध्ये राजकुमारी तमन्नाच मदत करू शकते, हे समजल्यानंतर अलाद्दिन तिच्याकडे मदत मागतो. पण रागाच्या भरात तमन्ना अलाद्दिनला मांजरामध्ये बदलते.दुसरीकडे यास्मीन (आशी सिंग) व फराज (आमिर दळवी) यांना अलाद्दिन परत न आल्यामुळे त्याच्याबाबत चिंता वाटू लागते. त्यांना समजते की, तमन्नाने अलाद्दिनला मांजरामध्ये बदलले आहे. अलाद्दिन यास्मीनला एका पोर्टलमध्ये घेऊन जातो, जेथे त्यांना अनेक लोक मांजराच्या रूपात दिसतात,ज्यांना तमन्नानेबदलले असते.अलाद्दिन व यास्मीनला समजते की खंजरचा पुढील तुकडा पोर्टलमध्ये आहे, जे फक्त मनुष्यच पार करू शकतो. यास्मीन दुविधेमध्ये सापडते. अलाद्दिनला मानवी रूपात आणण्यासाठी दुस-या कोणालातरी स्वत:चे बलिदान देत मांजरामध्ये बदलावे लागणार आहे.यास्मीन अलाद्दिनला कशाप्रकारे मदत करेल? यास्मीन तिचे बलिदान देत स्वत:ला बदलेल का?
Leave a Reply