
सोनी सबवरील हलकी-फुलकी कौटुंबिक मालिका ‘भाखरवडी’ने ७ वर्षांच्या कालांतरासह प्रेक्षकांना त्यांच्या टेलिव्हिजन स्क्रिन्ससमोर खिळवून ठेवले आहे. दोन्ही कुटुंबं अभिषेक(अक्षयकेलकर)व गायत्रीचा(अक्षिता मुद्गल) मुलगा कृष्णाला आनंदी ठेवण्यासोबत त्याच्यापासून दोन्ही कुटुंबांमधील भांडण लपवून ठेवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आली आहेत. पण कथेला एक धक्कादायक वळण मिळते.दोन्ही कुटुंबं कृष्णापासून सत्य लपवून ठेवण्यामध्ये यशस्वी ठरली आहेत. रेकॉर्डिंग असलेला पेन ड्राइव्ह तुटतो. मंदार पेन ड्राइव्ह दुरूस्त करतो आणि लॅपटॉपवरच सोडून जातो. नकळतपणे कृष्णा रेकॉर्डिंग ऐकतो आणि शेवटी त्याला दोन्ही कुटुंबांमधील भांडणाबाबतचे संपूर्ण सत्य समजते. हताश झालेला तो स्वत:ला एका खोलीमध्ये बंदिस्त करून घेतो आणि कुटुंबातील कोणत्याही सदस्याला न भेटण्याचे ठरवतो. गोखले व ठक्कर कुटुंबांना क्रिशबाबत चिंता वाटू लागते. ते त्याला खोलीमधून बाहेर येण्यास समजवण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांच्या हाती निराशाच येते. अखेर ते खोलीचा दरवाजा तोडून आतमध्ये येतात. पण तो खोलीमध्ये नसतो, ज्यामुळे सर्वांना धक्का बसतो. प्रत्येकजण कृष्णाला शोधण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांना अचंबित करत क्रिश घरामध्ये वकिलाला घेऊन येतो आणि दोन्ही कुटुंबांना नोटिस देतो की, त्याला ठक्कर व गोखले या दोन्ही कुटुंबांपासून वेगळे व्हायचे आहे.
दोन्ही कुटुंबं कृष्णाला कायमचे गमावणार का?
अभिषेकची भूमिका साकारणारा अक्षय केळकर म्हणाला,”कोणतेच आई-वडिल आपल्या मुलाला वेदनेमध्ये पाहू शकत नाही. अभिषेक व गायत्री एकत्र नसले तरी त्यांना त्यांच्या मुलाची खूप काळजी आहे. आता कृष्णाला सत्य समजले असल्यामुळे त्यांना त्याच्याबाबत अधिक चिंता वाटू लागली आहे. त्यांची आव्हाने येथेच संपत नाही. त्यांच्यासाठी आणखी एक धक्कादायक बातमी येते. कृष्णा त्यांना नोटिस देत त्यांच्यापासून वेगळे होण्याची इच्छा व्यक्त करतो. पुढे काय घडते, हे पाहणे प्रेक्षकांसाठी रोमांचक असणार आहे.”
Leave a Reply