
सोनी सबवरील मालिका ‘मॅडम सर‘मध्ये अत्यंत प्रतिभावान अभिनेता मनोज चंदिलाचा प्रवेश होताना पाहायला मिळणार आहे. मनोज चंदिला मालिकेमध्ये प्रसिद्धी मिळवण्यासाठी आसुसलेला अभिनेता अजय कुमारची भूमिका साकारणार आहे. सोनी सबवरील मालिका ‘मॅडम सर‘ चार डायनॅमिक महिला पोलिस अधिका-यांच्या दृष्टिकोनातून सामाजिक समस्यांना दाखवते. ही मालिका हलका-फुलका कन्टेन्ट आणि कलाकारांच्या प्रबळ अभिनयासह प्रेक्षकांची मने जिंकत आहे.मनोज चंदिला कॉप फ्रँचायझी चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेला लोकप्रिय बॉलिवुड सुपरस्टार अजय कुमारच्या भूमिकेत ‘मॅडम सर‘च्या आगामी एपिसोड्समध्ये प्रवेश करताना दिसणार आहे. तो शूटिंग करत नसताना देखील प्रसिद्धी मिळवण्यासाठी आसुसलेला आहे आणि त्याला नेहमीच लोकांमधील त्याची छबी व लुक्सबाबत चिंता असते.अजय त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी लखनौमध्ये येतो. त्याच्या मार्गामध्ये पुष्पा (सोनाली नाईक) गडदकाच असल्यामुळे त्याच्या कारला अडवते आणि त्याच्यावर दंड आकारते. अजयला या गोष्टीचा राग येतो आणि तो कार थांबवण्यासाठी पुष्पाचा अपमान करतो. अभिनेत्याकडून अपमानित झालेली पुष्पा तिच्या नोकरीचा राजीनामा देण्याचे ठरवते. दुसरीकडे एस.एच.ओ. हसीना (गुल्की जोशी) सर्वांना सांगते की, त्यांना अजय कुमारच्या सुरक्षिततेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे आणि तो त्यांच्या महिला पोलिस थानासमोर शूटिंग करणार आहे. मॅडम सर व टीम अजय कुमारचे नखरे सहन करतात, पण एका बॉम्बचीभिती अजयच्या जीवनासाठी धोकादायक ठरते तेव्हा स्थिती गंभीर वळण घेते.पुढे काय घडते आणि हसीना मलिक व तिची टीम अजय कुमारला कशाप्रकारे वाचवतात? आगामी एपिसोड्समध्ये या सर्व गोष्टींचा उलगडा पाहायला मिळेल.
Leave a Reply