
मालिका ‘बालवीर रिटर्न्स‘ला सुरूवातीपासूनच भरघोस यश मिळाले आहे, या यशामागे मालिकेमधील अद्वितीय पात्र आणि लक्षवेधक पटकथा हे कारण आहे, असे तुला वाटते का?अनोख्या पात्रांद्वारे साकारण्यात येणारी ‘बालवीर रिटर्न्स‘ची लक्षवेधक पटकथा निश्चितच मालिकेला मिळालेल्या यशामागील एक प्रमुख कारण आहे. तसेच बालवीर व सोनी सबच्या निष्ठावान व प्रेमळ चाहत्यांनी आम्हाला पाठिंबा देण्यासोबत आमच्यावर प्रेमाचा वर्षाव करणे सुरूच ठेवले आहे. मला तिम्नसाच्या भूमिकेसाठी विचारण्यात आले तेव्हा मी मालिका आणि तिच्या लक्षवेधक पटकथेकडे आकर्षून गेले. मी त्वरित या अद्भुत विश्वाचा भाग होण्यास होकार दिला.इतर कोणत्याही खलनायिकांच्या तुलनेत तिम्नसाला घातक व अनोखे करणारी बाब कोणती?तिम्नसा इतर खलनायिकांपेक्षा वेगळी असणारी बाब म्हणजे तिचा निर्दयीपणा व भव्य आभा. बालवीरच्या विश्वामध्ये गोंधळ निर्माण करत असल्यामुळे तुमच्या मनात या भूमिकेबाबत नकारात्मक भावना निर्माण होते. पण सोबतच तुम्ही तिच्या लुक व उपस्थितीची प्रशंसा करण्यापासून राहू शकत नाही. तिम्नसा पूर्णत: अभिमानाने व शक्तीने भरलेली आहे आणि तिला तिच्या मर्यादा कशा राखाव्या हे चांगलेच माहित आहे. तिम्नसा ही आतापर्यंत मी साकारलेल्या भूमिकांपैकी सर्वात प्रभावी नकारात्मक भूमिका आहे. मी सकारात्मक भूमिकेसह माझ्या करिअरची सुरूवात केली. मला लवकरच समजले की, माझ्या इतर प्रकल्पांमध्ये मला नकारात्मक भूमिका साकाराव्या लागणार आहेत. कथेमध्ये नकारात्मक भूमिका साकारणे आव्हानात्मक आहे. तुम्हाला प्रेक्षकांच्या तिरस्काराचा सामना करावा लागतो. अशा भूमिका बहुतांश प्रमाणात आवडत नाहीत. पण मला आनंद होत आहे की, चाहते व प्रेक्षक तिम्नसावर प्रचंड प्रेमाचा वर्षाव करत आहेत. प्रत्येकाला तिम्नसा भूमिका कायमस्वरूपी लक्षात राहिल आणि मला तिची भूमिका साकारण्याचा अभिमान वाटत आहे.
Leave a Reply