कोल्हापूर : लाड कमिटी शिफारशीनुसार झाडू व सफाई कामगारांच्या वारसांना नियुक्त्या देणेसह कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसदर्भात महानगरपालिका पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी संघाची संयुक्त बैठक आज महापालिकेच्या छ.ताराराणी सभागृहात संपन्न झाली.कोल्हापूर महानगरपालिका कर्मचारी संघाने लाड कमिटीच्या शिफारशीनुसार 180 कर्मचाऱ्यांना नियुक्ता देणेकामी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात सोमवारी (आज) मध्यरात्रीपासून संपावर जाणेची नोटीस दिली होती. यासदंर्भात महापौर सौ.अश्विनीरामाणे यांनी कर्मचारी संघाचे प्रतिनिधी व महापालिकेचे पदाधिकारी व अधिकारी यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन केले होते.
दि.4 फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीमध्ये सामान्य प्रशासन विभाग, आरोग्य विभाग व कर्मचारी संघ यांच्या समवेत वारसाहक्काने नेमणुका देणेच्या प्रलंबित प्रकरणांच्या कागदपत्रांची पडताळणी करणेबाबतचा निर्णय घेणेत आला होता. याअनुषंगाने आज या बैठकीत चर्चा करण्यात आली.
यावेळी झालेल्या चर्चेमध्ये लाड समितीच्या शिफारशीनुसार दिवसात येत्या आठ दिवसात संपुर्ण कागदपत्रांची पुर्तता केलेल्या 18 झाडू व सफाई कामगारांच्या वारसांना नियुक्ती देणे. तसेच प्रलंबित 34 वारसा प्रकरणांची कागदपत्रांची पुर्तता झालेनंतर नेमणुका देणेची कार्यवाही ठेवणे. रोजंदारीमधील 25 पदे कायम करणेबाबत तात्काळ कायदेशीर मत मागविणे असे निर्णय घेण्यात आले. तसेच इतर प्रलंबित मागण्याबाबंत दि.17 फेब्रुवारी बैठक आयोजीत करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी महापौर सौ.अश्विनी रामाणे यांनी कर्मचारी संघाने आज मध्यरात्रीपासून पुकारलेला संप मागे घ्यावा असे आवाहन केले. यावर कर्मचारी संघाने सोमवार (दि.8) मध्यरात्रीपासून पुकारण्यात आलेला संप मागे घेत असलेचे सांगितले.
यावेळी आयुक्त पी.शिवशंकर, परिवहन समिती सभापती लाला भोसले, विरोधी पक्षनेता संभाजी जाधव, गटनेता शारंगधर देशमुख, सभागृहनेता प्रविण केसरकर, उपायुक्त विजय खोराटे, नगरसेवक संतोष गायकवाड, कामगार अधिकारी उमाकांत कांबळे, मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ.विजय पाटील, कर्मचारी संघाचे अध्यक्ष रमेश देसाई, दिनकर आवळे, सुरेश सुर्यवंशी, विजय वणकुद्रे, विजय चरापले इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply