वाघेला यांनी घेतली मुख्य न्यायाधीश पदाची शपथ

 

IMG_20160216_223723मुंबई: न्या. धीरेंद्र हिरालाल वाघेला यांनी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदाची शपथ घेतली. दरबार हॉल, राजभवन येथे झालेल्या एका छोटेखानी समारोहात राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी न्या. वाघेला यांना पदाची शपथ दिली.

राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी न्या. वाघेला यांच्या नियुक्तीची राष्ट्रपतींनी जारी केलेली अधिसूचना वाचून दाखविल्यानंतर राज्यपालांनी त्यांना पदाची शपथ दिली.

मुंबई येथे बदलीवर येण्यापूर्वी न्या. वाघेला ओरिसा उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश पदावर कार्यरत होते. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्या. मोहित शाह यांचा कार्यकाल 8सप्टेंबर रोजी संपल्यानंतर न्या. विजया कापसे ताहिलरामाणी या मुख्य न्यायाधीश पदाचा अतिरिक्त कार्यभार पाहत होत्या.

शपथविधी समारोहाला राज्यपालांच्या पत्नी विनोदा,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री दीपक केसरकर, मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीश,महाधिवक्ता श्रीहरी अणे, राज्य मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्या. एस आर बन्नूरमठ, राज्याचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड तसेच शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!