कोल्हापूर : कोल्हापूर महनगरपलिकेची आज सर्व साधारण सभा झाली त्यात घरफाळा वाढीस तीव्र विरोध करण्यात आला.भांडवली मूल्य सुधारित करून 40 टक्के घरफाळा वाढ होणार होती. दर 5 वर्षानी ही वाढ करणे आवश्यक असते असे महापालिका प्रशासनचे म्हणणे आहे.राज्यात कुठेही भांडवली मुल्याच्या आधारित घरफाळा वसूल केला जात नाही तरी हा प्रस्ताव प्रशासनाने राज्य शासनांकडे पाठवू नये यावर आज सभागृहात सर्व नगरसेवकांचे एकमत झाले. आणि सर्व पक्षाच्या नगरसेवकांनी याला विरोध दर्शवत हा प्रस्ताव पुढील 5 वर्षासाठी नामंजूर करण्यात आला. आधी थकित घरफाळा वसूल करा मग वाढ करा असाही सुर महिला नगर सेवकांनी ओढला.

Leave a Reply