
कोल्हापूर/प्रतिनिधी: संकल्प ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कार्पोरेशन च्या वतीने ‘मेडीक्वीन मिसेस महाराष्ट्र’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाच्या लढ्यात डॉक्टरांचे योगदान अतिशय मोलाचे आहे. घराची, कुटुंबाची व मुलांची पर्वा न करता आजही डॉक्टर रुग्णसेवेसाठी तत्पर आहेत. यात विशेषतः महिला डॉक्टर आपले कुटुंब सांभाळत सामाजिक भान जपत रुग्णसेवा करताना दिसत आहेत. यासाठीच महिला डॉक्टरांना आपल्या अंगी असणाऱ्या कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील योगदान, त्यांचे व्यावसायिक यश, महिला डॉक्टरांचे उत्तम आरोग्य सौंदर्य, छंद, आवडीनिवडी प्रस्तुत करण्यासाठी संकल्पने या महिला डॉक्टरांसाठी या स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. ‘मेडीक्वीन मिसेस महाराष्ट्र’ या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून पहिल्या वर्षी या स्पर्धेस उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. अशी माहिती मेडिक्वीन समन्वयक डॉ. लीना पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. डॉ. लीला पाटील याबद्दल अधिक माहिती देताना म्हणाल्या,’मेडीक्वीन मिसेस महाराष्ट्र’ स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील महिला डॉक्टर सहभागी होत आहेत. आधुनिक वैद्यकीय शास्त्र त्यातील विविध शाखा जसे स्त्रीरोग तज्ञ, नेत्रतज्ञ, फिजिशियन, बालरोग तज्ञ, तसेच आयुर्वेद होमिओपॅथी फिजिओथेरपी अशा सर्व शाखांमधील डॉक्टरांना सहभागी होण्याचे आवाहन संकल्पद्वारे करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे स्पर्धेची प्राथमिक फेरी ऑनलाइन सुरू असून ऑनलाइन नोंदणीसाठी २० मार्चपर्यंत ची मुदत आहे. तसेच या स्पर्धेची अंतिम फेरी ९,१०,आणि ११ एप्रिल रोजी पुण्यामध्ये पार पडणार आहे. संकल्प च्या संचालिका डॉ.अपूर्वा अहिरराव म्हणाल्या, महिला डॉक्टरांचे सामाजिक कार्य, आत्मविश्वास, तंदुरुस्ती, आरोग्याच्या जागृतीसाठी तसेच त्यांच्यातील स्वत्वाचा शोध घेण्यासाठी ही विशेष स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. कोरोना काळात प्रत्येक जीव वाचवण्यासाठी त्यांची धडपड अपार प्रयत्न दिवस-रात्र मेहनत आणि समाजासाठी त्यांनी दिलेले योगदान यांचा सन्मान करण्यासाठी ही स्पर्धा घेत आहोत. स्पर्धेच्या माध्यमातून महिला डॉक्टरांना स्वतःला पुरेसा वेळ देता येईल. त्याचबरोबर पुन्हा नव्या जोमाने आत्मविश्वासाने कामांना सुरुवात करता येईल. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी www. mediqueens.in किंवा 98908818 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कशिश प्रॉडक्शनचे योगेश पवार यांनी या स्पर्धेचे संपूर्ण नियोजन केले आहे. स्पर्धेमध्ये सहभागी महिला डॉक्टरांसाठी स्पर्धेसाठी आवश्यक प्रशिक्षण ते देणार आहेत.
Leave a Reply