
कोल्हापूर:१५ मार्च जागतिक ग्राहक दिन भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालयात साजरा करण्यात आला. भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे व प्रमुख मार्गदर्शक श्री संदीप जंगम यांच्या हस्ते ग्राहक पंचायतीचे आराध्यदैवत श्री स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून ग्राहक तीर्थ आदरणीय कै.श्री बिंदुमाधव जोशी तथा नाना यांचे स्मरण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत .कमलाकर बुरांडे यांनी केले तसेच ते बोलताना म्हणाले, ग्राहक दिनाचे महत्व व भाजप कार्यकर्त्यांना ह्या चळवळीची आवश्यकता व सामान्य नागरिकांशी त्यांच्या विविध समस्यांवर ते कसे दिशा दाखवू शकतात ते सांगितले.कार्यक्रमाचे अध्यक्ष राहूल चिकोडे बोलताना म्हणाले, कार्यकर्ता व एक अभ्यासू, जागृत ग्राहक म्हणून आपण कोणतीही वस्तू खरेदी करताना वस्तूची समाप्ती दिनांक व वस्तूचे वजन तपासले पाहिजे. सोने-चांदी यांसारख्या किमती वस्तू खरेदी करताना हॉलमार्क तपासला पाहिजे. त्याच बरोबर खरेदी केलेल्या वस्तूचे बिल ग्राहकाने आवश्य घेतले पाहिजे. खरेदी करतेवेळी अशा सर्व गोष्टी चोखंदळपणे केल्यास ग्राहकाला नंतर पश्चाताप करावा लागणार नाही. त्यामुळे ग्राहक व दुकानदार उद्योजक हे नाते अधिक दृढ होईल. त्यामुळे ग्राहक दिनानिमित्त सर्वांनी ही चळवळ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे.
Leave a Reply