
कोल्हापूर :’मी रक्तदान करतोय, तुम्ही पण करा” असे आवाहन करत नामदार सतेज पाटील यांनी आज काँग्रेस कमिटी कार्यालयात रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते.पालकमंत्री नामदार सतेज पाटील आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या रकदान शिबिराला प्रारंभ झाला. या शिबिराला उत्स्फूर्त देत जवळपास 230 रक्तदात्यांनी रक्तदान केले.गेल्या एक दीड महिन्यापासून पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसतोय.या काळात अनेक रुग्णांना रक्ताची गरज भासत होती. कोल्हापूर जिल्ह्यातील रक्तपेढ्या मध्ये सध्या रक्त साठा कमी आहे.भविष्यात कुठेही रुग्णांना रक्त पुरवठा कमी पडू नये यासाठी आज पालकमंत्री नामदार सतेज पाटील यांनी आज काँग्रेस कमिटी येथे रकदान शिबिराचे आयोजन केले होते. पालकमंत्र्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत या रक्तदान शिबिरासाठी अनेक रक्तदात्यांनी रक्तदान करत पालकमंत्र्यांच्या सामाजिक उपक्रमाला पाठबळ दिले. पालकमंत्री नामदार सतेज पाटील यांनी देखील या शिबिरात स्वतः सहभागी होत रक्तदान केले पालकमंत्री नामदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी मी रकदान करतोय तुम्हीही रक्तदान करा.असे आवाहन करीत रक्तदान करण्याचे आवाहन रक्तदात्याना केले होते.
या आवाहनाला प्रतिसाद देत जवळपास रक्तदात्यांनी रक्तदान केले.डॉ डी वाय पाटील हॉस्पिटल,सीपीआर,राजर्षी शाहू ब्लड बँक यांच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.विशेष म्हणजे या शिबिरात माजी महापौर निलोफर आजरकेर यांच्यासोबत स्वाती नलवडे, उज्वला चौगले,पद्मिनी माने,शिवांगी खोत या महिलांनी देखील रक्तदान केलं.सुरुवातीला उजळाइवाडी येथील राहुल मिनेकर आणि निशा मिनेकर या दाम्पत्यान रक्तदान केले.याबाबद्दल नामदार सतेज पाटील आमदार ऋतुराज पाटील यांनी विशेष कौतुक केले.आजच्या रक्तदान शिबीरासाठी नेटक नियोजन करत प्रथम प्रत्येक रक्तदात्याची लेखी नोंदणी करून रक्तदान करून घेतले जात होते.रक्तदान केलेल्या प्रत्येक रक्तदात्याला नामदार सतेज पाटील आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी नामदार सतेज पाटील यांनी सामाजिक बांधिलकीच्या उद्देशाने राबवलेल्या या उपक्रमाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.यावेळी आमदार ऋतुराज पाटील माजी महापौर प्रल्हाद चव्हाण गुलाबराव घोरपडे बाळासाहेब सरनाईक विद्याधर गुरबे माजी नगरसेवक तोफिक मुल्लाणी प्रविण केसरकर सचिन चव्हाण संजय पवार वाईकर संपत चव्हाण किशोर खानविलकर रंगराव देवणे जय पटकारे दुर्वास कदम शारंगधर देशमुख संजय मोहिते दीपक थोरात विनायक कारंडे संध्या घोटणे चंदा बेलेकर लीला धुमाळ हेमलता माने सुलोचना नायकवडी पूजा आरडे विद्या घोरपडे यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
Leave a Reply