कोरोना लढ्यासाठी शिवसेनेची “माझे शहर- माझी जबाबदारी” हेल्पलाईन मोहीम

 

कोल्हापूर : गेल्या वर्षापासून सुरु असलेला कोरोना रोगाचे थैमान थांबविण्यासाठी मुख्यमंत्री नेतृत्वाखाली राज्य शासन प्रयत्नशील आहे. गेल्या दहा दिवसातील परीस्थितीचा गांभीर्याने विचार करता कोरोना रुग्णांची व्याप्ती अधिक वाढत आहे. कोरोना विरुद्धच्या लढ्यात महाराष्ट्र राज्य शासन, डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस कर्मचारी, सफाई कर्मचारी सह सर्वच शासकीय यंत्रणा अहोरात्र काम करीत आहेत. मुख्यमंत्री  संपूर्ण राज्यातील नागरिकांची कुटुंबांप्रमाणे काळजी घेत आहेत. राज्य शासनाने सुरु केलेली “माझे कुटुंब.. माझी जबाबदारी” मोहिमेनुसार कोरोना रुग्णांवर उपचार आणि लसीकरण केले जात आहे. त्याच धर्तीवर कोल्हापूर शहरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि गतवर्षीचा कोरोनाचा अनुभव लक्षात घेता शहरातील नागरिकांसाठी शिवसेना *“माझे शहर – माझी जबाबदारी”* हि मोहीम हाती घेत आहे. यामध्ये हेल्पलाईन नंबरशी संपर्क साधून अत्यावश्यक रुग्णसेवा आणि कोरोना बाबतची अधिक माहिती नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन *राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धीपत्रक प्रसिद्धीस दिले आहे.
या पत्रकात पुढे म्हंटले आहे कि, कोल्हापूरवासीयांचे दातृत्व जगजाहीर आहे. गतवर्षीच्या कोरोना लढ्यात कोरोना योद्धांच्या कर्तुत्वाने आणि शहरवासीयांनी दाखविलेल्या धैर्यामुळे परिस्थिती आटोक्यात आणण्यात प्रशासन यशस्वी झाले होते. परंतु, पुन्हा या रोगाचा वाढता संसर्ग पाहता नागरिकांनी पुनः खबरदारी घेणे गरजेचे आहे. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईक सैरभैर होतात. कोणत्या दवाखान्यात जागा उपलब्ध आहे, कोठे उपचार मिळतील, कोठे ऑस्कीजन व व्हेंटीलेटरची सुविधा असलेले बेड उपलब्ध आहेत, रुग्णवाहिकेची गरज भासल्यास कोणाला फोन करायचा, हॉस्पिटलच्या बिलाच्या तक्रारी, यासह इतर अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागते. नागरिकांनी अशा प्रसंगी घाबरून न जाता शिवसेनेशी संपर्क साधावा. कोरोना विरुद्धच्या लढ्यात कोल्हापूर शहरवासियांसाठी “माझे शहर – माझी जबाबदारी” ही हेल्पलाईन मोहीम शिवसेना कोल्हापूर शहर च्या वतीने राबविण्यात येत आहे. अत्यावश्यक रुग्णांना बेडची व्यवस्था, रुग्णवाहिका, क्वारंटाईन सेंटर, उपचार आदी बाबत सविस्तर माहिती आणि मदत या हेल्पलाईन द्वारे करण्यात येणार आहे, अशी माहिती *राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष.राजेश क्षीरसागर* यांनी दिली.
यासह कोरोनाच्या गंभीर परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री  आदेशानुसार शिवसैनिक सामाजिक कार्यात अग्रभागी आहेत. सामाजिक बांधिलकी जपून शासनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करून शिवसेनेचे मदत कार्य सुरु राहील, या परीस्थित शिवसेना शहरवासीयांच्या सोबत आहे. कोरोनोच्या धर्तीवर शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे, कोरोनो व्हायरस पासून संरक्षणासाठी योग्य त्या उपाययोजना व काळजी नागरिकांनी घ्यावी, तसेच नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, कोरोनोची लक्षणे दिसल्यास नागरिकांनी घाबरून जावू नये, तातडीने शिवसेनेच्या हेल्पलाईन किंवा नजीकच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले.
*“माझे शहर – माझी जबाबदारी” हेल्पलाईन नंबर *७०२८०३९०९९/७०२८०४९०९९/७०२८०६९९०९९/७०२८०७९०९९*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!