
कोल्हापूर: कोल्हापूर येथील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती विसर्जित करण्याचे आदेश राज्य शासनाच्या विधी आणि न्यायविभाग यांनी ८ एप्रिल या दिवशी काढले आहेत. या समितीवर आता प्रशासक म्हणून जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या आदेशामुळे समितीचे अध्यक्ष महेश जाधव (भाजप) यांच्यासह ६ सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांसह ३ सहस्र ४२ मंदिरांचे नियंत्रण या समितीकडे आहे. यात प्रामुख्याने श्री महालक्ष्मी देवी आणि जोतिबा मंदिर या मंदिरांचा समावेश आहे.
राज्यात वर्ष २०१४ मध्ये भाजप-शिवसेना युतीचे सरकार आल्यानंतर १६ ऑगस्ट २०१७ या दिवशी राज्य शासनाने समितीच्या अध्यक्षपदी महेश जाधव यांनी नियुक्ती केली. या समितीत कोषाध्यक्ष म्हणून सौ. वैशाली राजेश क्षीरसागर, तर सदस्य म्हणून शिवाजी जाधव, राजेंद्र जाधव, राजाराम गरुड, चारुदत्त देसाई यांची नियुक्ती करण्यात आली होती. सध्या राज्यात महाविकास आघाडी सरकार असून राष्ट्रवादी काँग्रेसकडे याचे अध्यक्षपद जाणार आहे, अशी चर्चा आहे.
Leave a Reply