विकास कामांकरीता सात कोटी रु. मंजूर: खा.संजय मंडलिक

 

कोल्हापूर  : नुकत्याच झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये व जिल्हा वार्षिक योजनेमधून चंदगड, आजरा व राधानगरी तालुक्यासाठी सुमारे सात कोटी रु. चा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती खासदार संजय मंडलिक यांनी दिली.  यासंदर्भात अधिक माहिती देताना खासदार मंडलिक म्हणाले, राधानगरी तालुक्यातील म्हासुर्ले धनगरवाडा येथे गेल्या पावसाळ्यात रस्ता व्यवस्थित नसले कारणाने गरोदर महिलेस औषधोपचार वेळेत न मिळाल्याकारणाने प्राण गमवावा लागला होता.  याकरीता आवश्यक बाब म्हणून म्हासुर्ले ते सावतवाडी ते मधला धनगरवाडा जोड रस्त्यावरील 0/500 किमी मध्ये ओढ्यावर साकव बांधणेकरीता जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 35 लाख रु. मंजूर केल्याने म्हासुर्ले पैकी मधला धनगरवाडा, पादुकाचा धनगरवाडा, राणग्याचा धनगरवाडा येथील नागरीकांची दवाखाना, बँका, बाजार आदीकरीता जवळचा बारमाही मार्ग होणार आहे.  तसेच राधानगरी धरण स्थळावर लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांनी जलसिंचनाच्याबाबतीत दुरदृष्टीने सुमारे 100 वर्षापुर्वी राधानगरी धरण हा देशातील त्यावेळच्या परिस्थितीमध्ये सर्वात मोठा पाटबंधारे प्रकल्प उभा केल्याने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हरितक्रांती होवून जिल्हा सुजलम्-सुफलम् झाला.  राधानगरी धरण हे स्थापत्य शास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना असलेने याठिकाणी देशभरातील हजारो पर्यटक या धरणास भेट देत असतात.  लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांनी धरण निर्मीतीचे ऐतिहासीक कार्य केले याबाबतची माहिती या पर्यटकांना मिळावी म्हणून याठिकाणी केंद्र परिसर सुधारणा व बागबगिचा करणे तसेच धरण स्थळावर दगडी फरशी बसवून विद्यूतीकरण करणे याकरीता 50 लाख रु. चा निधी पर्यटन स्थळांचा विकास अंतर्गत मंजूर झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!