
मुरगुड: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) पंचवार्षिक निवडणुकीकरिता मुरगूड येथे सत्तारूढ राजर्षी शाहू आघाडीचा काल कागल तालुक्यातील ठराव धारकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ठराव धारकांनी दाखवलेला प्रतिसाद खूप लाख मोलाचा होता. सत्तारूढ राजर्षी शाहू आघाडीला मतदान करताना गोकुळचा असणारा चौकस कारभार आणि पारदर्शकता या बाबतीत सर्व ठरावधारक निश्चिंत आहेत. गेल्या अनेक वर्षापासून गोकुळने केलेल्या कामाची पोचपावती त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. निश्चितच राजर्षी शाहू आघाडीला सभासद प्रचंड मतांनी विजयी करतील आणि पुन्हा दूध उत्पादकांच्या विकासासाठी हा संघ कटिबद्ध राहील, असा विश्वास उमेदवार अंबरीषसिंह घाटगे यांनी व्यक्त केला.
Leave a Reply