
कोल्हापूर :केशवराव भोसले नाटयगृह व राजर्षी शाहू खासबाग कुस्ती मैदानाचे उद्घाटन व 8 मार्च महिला दिनानिमीत्त महापालिकेच्यावतीने विविध विविध पारंपारिक आणि आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत दि.6 ते 10 मार्च 2016 पर्यत पाच दिवस भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये रविवार, दि.6 मार्च 2016 रोजी सकाळी 9.30 वाजता प्रसिध्द अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते केशवराव भोसले नाटयगृहातील फित कापून मुख्य पडदयाचे उद्घाटन होणार आहे. तसेच पोवाडा, आर्किटेक्चर, कॉन्ट्रक्टर, अधिकारी व पैवलान यांचा मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. सायंकाळी 5.00 वाजता नरशार्दुल राजा संभाजी हा ऐतिहासिक नाटय प्रयोग होणार आहे.
दि.7 मार्च रोजी केशवराव भोसले नाटयगृहामध्ये सायंकाळी 5 ते 8 यावेळेत महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा सांगणारे व प्रत्यक्ष रंगमंचावर विविध पारंपारीक वेशभुषेतील कलाकारांचा अंतरंग प्रस्तुत जय जय महाराष्ट्र हा सांस्कृतिक कार्यक्रम.
दि.8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त कोल्हापूर महानगरपालिका आणि डॉ.डी.वाय. पाटील कला, क्रीडा, शैक्षणिक व सांस्कृतिक ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यामाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 8 मार्च रोजी जेष्ठ अभिनेत्री डिंपल कपाडीया यांच्या उपस्थित रॅली संपन्न होणार आहे. या रॅलीमध्ये विशेष वेशभुषेमध्ये महिला सहभागी होणार आहेत. याशिवाय फॅशन शो, ग्रुपडान्स, मिसेस गृहिणी, मिस युवती असे कार्यक्रम आयोजीत करण्यात आले आहेत. यामध्ये विजेत्या स्पर्धेकांना रोख बक्षीसे, मोमंटो व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. तसेच केशवराव भोसले नाटयगृहामध्ये सायंकारी 5.00 वाजता संजय मोहिते प्रस्तुत अपना सपना फनी फनी विनोदी नाटक आयोजीत करण्यात आला आहे.दि.9 मार्च रोजी सायंकाळी 5.00 वाजता रंकाळा पदपथ उद्यान येथे महिला बालकल्याण समितीमार्फत खास महिलांसाठी लावणी कार्यक्रम.
दि.10 मार्च रोजी सायंकाळी 5.00 वाजता केशवराव भोसले नाटयगृहामध्ये सुनिल घोरपडे नटसम्राट नाटयप्रयोग पदाधिकारी, नगरसेवक निमंतीतांसाठी आयोजीत करण्यात आला आहे
Leave a Reply