
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेचे संगीतसुर्य केशवराव भोसले नाटयगृह व राजर्षी शाहू खासबाग कुस्ती मैदानाचे उद्घाटन आज ( दि.6 मार्च ) या उद्घाटन प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते झाले. उपस्थित राजकारणी मंडळींचा जणू नानांनी पंचनामाच केला. हे जतन करण्याची जबाबदारी प्रेक्षकांची आहे असे नाना म्हणाले. नानांच्या शाब्दिक कोपरखळया यामुळे टाळ्या आणि हास्य यामुळे नाट्यगृह पुन्हा जिवंत झाले.27 लाखांचा निधी नाम फाउंडेशन ला देण्यात आला. यावेळी पालक मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी उर्वरित निधी देणे ही सरकारची जबाबदारी आहे असे सांगितले. आमदार बंटी पाटील म्हणाले पाठ पुरवा करून 5 कोटी निधी मागितला पण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी 10 कोटी दिले.अजित पवार यांनी त्याला साथ दिली असे आमदार हसन मुश्रीफ यांनी सांगितले.आमदार क्षीरसागर म्हणाले हे नाट्यगृह कोल्हापुरसाठी अभिमानाची गोष्ट आहे महापौर अश्विनी रामाणे यांनी कोल्हापूरच्या इतर समस्या भाषणात मांडल्या. यावेळी उपमहापौर सौ.शमा मुल्ला, स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ.वृषाली कदम, सभागृहनेता प्रविण केसरकर, गटनेता शारंगधर देशमुख, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, सहाय्यक आयुक्त उमेश रणदिवे, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, उपशहर अभियंता एस.के.पाटील, माजी नगरसेवक मधुकर रामाणे, दुर्वास कदम आणि नागरिक आदी उपस्थित होते.नाट्यगृहसाठी परिश्रम घेतलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
Leave a Reply