कोल्हापूर :जागतिक महिला दिनानिमित्त कोल्हापूर महानगरपालिका आणि डॉ.डी.वाय. पाटील कला, क्रीडा, शैक्षणिक व सांस्कृतिक ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यामाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये आज जेष्ठ अभिनेत्री डिंपल कपाडीया यांच्या उपस्थित रॅली संपन्न होणार आहे. या रॅलीमध्ये विशेष वेशभुषेमध्ये महिला सहभागी होणार आहेत. याशिवाय केशवराव भोसले नाटयगृहामध्ये फॅशन शो, ग्रुपडान्स, मिसेस गृहिणी, मिस युवती असे कार्यक्रम आयोजीत करण्यात आले आहेत. यामध्ये विजेत्या स्पर्धेकांना रोख बक्षीसे, मोमंटो व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे.
तसेच केशवराव भोसले नाटयगृहामध्ये सायंकारी 5.00 वाजता संजय मोहिते यांचा अपना सपना फनी फनी विनोदी नाटक आयोजीत करण्यात आला आहे.
दि.9 मार्च रोजी सायंकाळी 5.00 वाजता रंकाळा पदपथ उद्यान येथे महिला बालकल्याण समितीमार्फत खास महिलांसाठी लावणी कार्यक्रम व विविध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ होणार आहे.
तरी या कार्यक्रमास महिलांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महापौर सौ.अिानी रामाणे, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ.वृषाली कदम यांनी केले आहे

Leave a Reply