
सुभाष घई हे बॉलिवुडमधले एक प्रयोगशील दिग्दर्शक. घई यांनी ‘कू’वर आता आपला नवा सिनेमा रसिकांच्या भेटीला येत असल्याची घोषणा केली आहे.या सिनेमाचे नाव ‘विजेता’ असून हा एक मराठी चित्रपट आहे. ‘मुक्ता आर्ट्स’ने या सिनेमाची निर्मीती केली आहे. यात मराठीतले लोकप्रिय कलाकार दिसणार आहेत. सुबोध भावे, पूजा सावंत, प्रीतम कागणे, सुशांत शेलार, माधव देवचक्के, कृतिका तुळसकर, तन्वी किशोर, देवेंद्र कागणे ही त्यातली काही नावे. ‘विजेता’ येत्या 10 डिसेंबरला रिलीज होणार आहे. खरेतर हा सिनेमा 12 मार्च, 2020 ला रिलीज झाला होता. पण कोरोनामुळे त्याचे प्रदर्शन एकाच दिवसात मागे घेतले गेले. आजवर त्यांनी बनवलेल्या वैविध्यपूर्ण सिनेमांना रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. हा सिनेमा आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा असल्याचे घई यांनी म्हटले आहे.
सिनेमाबाबतचा एक व्हीडिओही घई यांनी शेअर केला आहे.
‘विजेता’ चित्रपटात सुबोध भावे यांनी खेळाडुंच्या माइंड कोचची भुमिका साकारली आहे. तो खेळाडुंना आत्मविश्वास देत त्यांना सामना जिंकण्यास मदत करतो. या कथानकाला महाराष्ट्राच्या क्रिडाविश्वाची पार्श्वभूमी आहे.
घई यांनी कू करताना म्हटले आहे, ‘
“https://www.kooapp.com/koo/subhashghai/d5aa6410-6b6a-481a-bec8-e1fc2d6113ca”
Leave a Reply