विशालगडावरील ऐतिहासिक तोफेला बजरंग दलाचा मानाचा मुजरा

 

IMG_20160309_230236कोल्हापूर : महाशिवरात्र या पावन दिवसाचे औचित्य साधून विश्वहिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने विशालगडावरील ३५० वर्षे प्राचीन तोफ उचलून मुंडा दरवाज्याजवळील चौथऱ्यावर उचलून ठेवली.३ टन इतके या तोफेचे वजन असून बेवारसपणे हि तोफ किल्ल्याच्या एका बाजूस होती.छत्रपती शिवाजी महाराज विशालगडावर पोहचल्यावर हीच तोफ धडाडली होती.पावनखिंडीतील रणसंग्रामावेळी या तोफेची भूमिका महत्वाची होती.इतिहासाची साक्ष देणाऱ्या ३५० वर्षाच्या अवहेलनेनंतर या तोफेला मानाचा मुजरा मिळाला.बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे यांच्या समाधीची सेवा करून नरवीर दौड काढण्यात आली.मान्यवारांचा सत्कार यावेळी करण्यात आला.कार्यक्रमासाठी बंडू भोसले,प्रशांत कागले,सुधीर सूर्यवंशी यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.गडवासी,कार्यकर्ते व शिवभक्त यांना भोजन आणि प्रसाद वाटप करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!