
कोल्हापूर : महालक्ष्मी मंदिरात मनकर्णिका कुंड नावाचे पवित्र व अती प्राचीन कुंड आहे.तेथे पुरातत्व खात्याला विचारात न घेता अनधिकृतपणे शौचालय बांधले गेले.हे दुष्कर्म करत असताना किंवा झाल्यावर करोडो लोकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या महालक्षमी भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.तरी कोल्हापूरच्या लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केले.वेळोवेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे याचे लक्ष वेधले पण कोणतीच कारवाई याबाबत झाली नाही.आत्ताचे जिल्हाधिकारी,महापालिका प्रशासन किंवा लोकप्रतिनिधी यांनाच याबाबत जबाबदार धरले पाहिजे.यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि हे शौचालय त्वरित हटवावे अशी मागणी आज सर्व हिंदुत्ववादी संघटनांची पत्रकार परिषदेत केली.मंदिराच्या ठिकाणी शौचालय बांधणे हा घृणास्पद प्रकार आहे असे श्रीराम सेनेचे अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी सांगितले.एक महिन्याच्या आत हि कारवाई झाली पाहिजे किंवा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.अनधिकृत धार्मिक स्थळे शासन पडण्यास तत्पर आहे पण अनधिकृत शौचालय मात्र का पाडत नाही असा खडा सवाल बंजरंग दलचे महेश उरसाल यांनी केला.देवस्थान समितीच्या घोटाळ्याची चौकशी आणि कॉ.पानसरे हत्या चौकशी पथकाचे प्रमुख अधिकारी संजीव कुमार आहेत.मग देवस्थानची चौकशी जलद का होत नाही असे सनातनचे प्रवक्ते अभय वर्तक म्हणाले. आज जुना राजवाडा पोलीस स्टेशन मध्ये याबाबत तक्रार नोंदविली आहे.असेही ते म्हणाले.यावेळी समीर पटवर्धन,संभाजी साळुंखे,मधुकर नाझरे,चंद्रकांत बराले यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनाचे पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a Reply