
कोल्हापूर :ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या खून खटल्यातील संशयित आरोपी सनातन चा साधक आसलेला समीर गायकवाड याच्या विरोधात दोषारोप निश्चितीचा निर्णय आज पुन्हा लांबणीवर पडलाय. या प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश एल. डी. बिले यांच्यासमोर झाली. या सुनावणीत सरकारी वकिल चंद्रकांत बुधले यांनी सरकारची बाजू मांडली , या खूनचा तपास व दाभोळकर , कलबुर्गी यांच्या खून प्रकरणाचा तपास पोलीस एकत्रितपणे पण करत असल्याने समीर गायकवाड वर आरोप निश्चिती होऊ नये असा युक्तिवाद केला.पोलिसांना पुरवणी दोषारोप दाखल करण्याची मुभा आहे. तसंच उच्च न्यायालय हि आरोप निश्चिती करू नये या बाजूने आहे त्यामुळे आरोप निश्चित नाकसल्याच बुधले यांनी सांगितलं तर समीर गायकवाडचे वकील समीर पटवर्धन यांनी पोलिसांचा तपास सुरु असल्याच्या नावाखाली आरोपीला जेल मध्ये ठेवणे चुकीचे असून आरोप निश्चित करून खटला पुढे सुरु ठेवा अशी मागणी न्यायालयात केलीय. या प्रकरणी पुढील सुनावणी 29 मार्च रोजी होणार असून आज पुन्हा समीर गायकवाड ला जमीन मिळवा यासाठी दुसरा जमीन अर्ज समीरच्या वकिलांनी दाखल केला आहे त्यावर 14 मार्च ला सुनावणी होणार आहे
Leave a Reply