
कोल्हापूर : किरकोळ वादावादीतून मारहाण झालेल्या अजित विजय पाटील(वय 34 रा. राजरामपुरी, दौलात्नगर) येथील सेंटरिंग कामगारचा मृत्यु झाला.आरोपी राजश्री हळदकर आणि तिचा भाऊ संजय सावंत यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राजश्री आणि मयत पाटील शेजारी राहतात. पाटील यांचि पत्नी आणि राजश्री यांच्यात नेहमी भांडण व्हायचे. काल रात्रीही अशीच वादावादी सुरु असताना पाटील मधे आले असता मारहाण सुरु झाली आणि धक्काबुक्की मधे ते खाली पडले उपचारसाठी नेताना त्यांचा मृत्यु झाला. राजश्री ची दोन्ही मुले फारारी आहेत.
Leave a Reply