
मुंबई : केंद्र शासनाने बी.टी.कापूस बियाणाचे दर कमी केल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात मोठी कपात होणार असल्याची माहिती कृषीमंत्री एकनाथराव खडसे यांनी आज विधानसभेत व विधानपरिषदेत एका निवेदनाद्वारे दिली. केंद्र शासनाने बी.टी.बोलगार्ड- 1 चे दर रुपये 635/- प्रति पाकीट व बोलगार्ड-2 वे दर रुपये 800/- प्रति पाकीट असे निश्चित केले आहेत. केंद्र शासनाच्या दिनांक 8 मार्च 2016 च्या अधिसूचनेअन्वये संपूर्ण देशाकरिता हे दर कमी करण्यात आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात आणखी घट होण्यास मदत होईल, असेही खडसे यांनी विधानसभेत सांगितले.
महाराष्ट्रात बी. टी. कापूस पेरणी क्षेत्र साधारणत: 38 लाख हेक्टर आहे. याकरिता सर्वसाधारण 1.5 कोटी पाकीटे प्रविवर्षी विक्री होते. यापैकी बी. टी. कापूस बोलगार्ड-2 ची विक्री 95 टक्के व उर्वरित बी. टी. कापूस बोलगार्ड- 1 ची विक्री होते. दि. 8 जून, 2015 च्या अधिसूचनेनुसार महाराष्ट्र शासनाने बी. टी. कापूस बोलगार्ड-1 चे दर रु.730/- प्रति पाकीट आणि बी. टी. कापूस बोलगार्ड-2 चे दर रु.830/- प्रति पाकीट असे निश्चित केले होते. दि. 08 जून, 2015 पूर्वी सदर दर बोलगार्ड-1 करीता रु. 830/- प्रति पाकीट आणि बी.टी.कापूस बोलगार्ड-2 करीता रु. 930/- प्रति पाकीट असे होते. प्रत्येक पाकीटामागे 100 रुपये दर कमी केल्यामुळे शेतकऱ्यांच्या कापूस उत्पादन खर्चात यापूर्वीच 150 कोटी रुपयांची बचत झाली आहे, अशी माहिती कृषीमंत्री श्री. खडसे यांनी दिली.
राज्य शासनाने केलेली दर निश्चिती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वैध ठरवली होती. तद्नंतर केंद्र शासनाने दिनांक 7 डिसेंबर 2015 च्या अधिसूचनेन्वये संपूर्ण देशातील बी.टी.कापूस बियाणांचे दर निश्चित करण्याचे अधिकार केंद्र शासनास असल्याचे धोरण ठरविले.
त्याअनुषंगाने केंद्र शासनाच्या दिनांक 8 मार्च, 2016 च्या अधिसूचनेन्वये संपूर्ण देशाकरीता बी.टी.कापूस बोलगार्ड-1 चे दर रु. 635/- प्रति पाकीट व बोलगार्ड-2 चे दर रु. 8 .होतील.
Leave a Reply