
नांदेड : दुष्काळाच्या संकटावर मात करण्यासाठी जनतेत जाऊन संवाद साधा. निसर्गाच्या प्रकोपावर मात करण्यासाठी सरकार आणि प्रशासन जनतेच्यासोबत असल्याचा विश्वास द्या. त्यासाठी युद्धपातळीवर काम करा, असे निर्देश राज्याचे परिवहन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दिवाकर रावते यांनी दिले.
पालकमंत्री रावते यांनी आज जिल्ह्यातील टंचाई आढाव्यासाठी विशेष बैठक घेतली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. सुमारे अडीच तास चाललेल्या या बैठकीत रावते यांनी जिल्ह्यातील टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत तसेच आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे निर्देश तर दिलेच त्याचबरोबर पाणी, चारा, टॅंकर, शेततळे योजना, रोहयो या विषयांतील सर्वंकष आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील डॅा. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे बैठक संपन्न झाली.
बैठकीसाठी नांदेड वाघाळा महापालिकेच्या महापौर सौ. शैलजा स्वामी, सर्वश्री आमदार वसंतराव चव्हाण, प्रताप पाटील-चिखलीकर, सुभाष साबणे, हेमंत पाटील, डॅा. तुषार राठोड यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आदींची प्रमुख उपस्थिती होती. तसेच जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, पोलीस अधीक्षक परमजितसिंह दहीया, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यु काळे, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी जिल्हा परिषद, कृषि, जलसंपदा, पशूसंवर्धन अशा सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती
Leave a Reply