
मुंबई : जागतिक जलदिनाचे औचित्य साधून राज्यात 16 ते 22 मार्च हा ‘जल जागृती सप्ताह’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून आज.देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ मंत्रालय प्रांगणात होणार आहे.
या जलजागृती सप्ताहाच्या शुभारंभाप्रसंगी कृषी मंत्री एकनाथ खडसे, वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, पर्यावरण मंत्री रामदास कदम, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, ग्रामविकास मंत्री श्रीमती पंकजा मुंडे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, ग्रामविकास राज्यमंत्री दिपक केसरकर, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, कृषी राज्यमंत्री प्रा.राम शिंदे, नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील, पर्यावरण राज्यमंत्री प्रविण पोटे पाटील आणि मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात राज्यातील अनेक नद्यांतून आणलेल्या पाण्याचे पूजन करण्यात येणार आहे. जलसंपदा मंत्री या जलसप्ताहानिमित्त प्रास्ताविक करतील. त्यानंतर मुख्यमंत्री श्री. फडणवीस हे उपस्थितांना मार्गदर्शन करतील.या जलजागृती अभियानास उपस्थित राहण्याचे आवाहन कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डी.के.जैन, पर्यावरण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव श्रीमती मालिनी शंकर, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव सतिश गवई, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव गिरीराज, उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्र, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव राजेशकुमार, जलसंधारण विभागाचे सचिव प्रभाकर देशमुख, माहिती व जनसंपर्क महासंचालक चंद्रशेखर ओक, लाभक्षेत्र विकास सचिव शिवाजी उपासे यांनी केले आहे.
Leave a Reply