
कोल्हापूर : धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मधिल भिमा इंस्टिट्यूट ऑफ़ मॅनेजमेंट आणि टेकनोलॉजी बि मॅट विकासवाडी कागल या महाविद्यालयाच्या वतीने उद्या २३ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.रिसेंट इनोव्हेशन्स इन इंजिनिअरिंग अड मॅनेजमेंट या विषयावर ही परिषद आयोजित केली आहे.या परिषदेसाठी अनेक राज्यांसह अमेरिका,कोरिया आदि देशातील संशोधक सहभागी होणार आहेत.तसेच परिषदेच्या निमित्ताने वरिष्ठ संशोधकांच्या मार्गदर्शनाचा लाभ नवीन संशोधकांना घेता येईल.त्यातून त्यांना येणाऱ्या समस्यावर मात करता येईल.सध्या जगात असणाऱ्या तंत्रज्ञानाच्या निकडीनुसार त्यांना ज्ञान आत्मसात करण्याची प्रेरणा मिळेल.यामुळे उद्योगांसाठी अभिप्रेत कुशल तंत्रज्ञ बाहेर पडतील.असा विश्वास प्राचार्य डॉ.आशिष के.गुरव यांनी व्यक्त केला.यात सहभागी विद्यार्थ्यांचे शोधनिबंध आंतरराष्ट्रीय जर्नल्स मधून प्रकाशित होणार आहेत.तसेच इन्टरनेटवरही उपलब्ध करण्यात येणार आहेत.
परिषदेस ओटीसा तंत्रविद्यालयाचे प्रा.डॉ.सुबेंदूकुमार पाणी,गुजरात मधून डॉ.भविन सेदानी,डॉ.दिपेश कामदार,पंजाब मधून डॉ.सिमरजीत कौर हे काम पहात आहेत.तांत्रिक सल्लागार म्हणून अमेरिकेचे डॉ.कोरेल,डॉ.डी.जेन स्टेनले,सौदी अरेबियाचे प्रा.अब्दुल रौफखान,फुत्रा मलेशिया विद्यापीठाचे डॉ.एइला फॅलाहटी हे कार्यरत आहेत.आय.एस.टी.ई चे प्रमुख प्रतापसिंह देसाई आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत परिषद पार पडेल.परिषदेस प्रा.अभिजित हावळ,प्राचार्य,संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मिलिंद धोंड यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
Leave a Reply