
कोल्हापूर – राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांची आज शिवसैनिकांनी अणेंची ही प्रतिकात्मक अंत्ययात्रा शहरातील प्रमुख मार्गावरुन काढली आणि प्रतिकात्मक तिरडी जयंती नाल्यात फेकून दिली. अणे यांनी मराठवाडा स्वतंत्र करा, अशी मागणी केली होती. त्यामुळे राज्यात वाद निर्माण झाला असून, त्यांच्याविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादीसह शिवसेनेनेही अणेंच्याविरोधात मोहीम उघडली आहे. त्यामध्ये शिवसेनेने आक्रमक होत आंदोलन सुरू केले. या आंदोलनात महिला कार्यकर्त्याही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.यावेळी जिल्हाप्रमुख संजय पवार,शहर प्रमुख शिवाजीराव यादव,दुर्गेश लिंग्रज,रवी चौगुले, दत्ता टीपुगडे, राजू पाटील यांच्यासह कार्यकर्ते सहभागी होते.
Leave a Reply