

प्रारंभी उपजल अभियंता प्रभाकर गायकवाड यांनी शहराला वर्षाला 50 दशलक्ष घनमीटर पाणी लागत असल्याचे सांगितले. यामध्ये दिवसाला महापालिका शिंगणापुर बंधारा येथून 120 एमएलडी पाणी उचलते. दुष्काळामुळे राधानगरी धरणात कमी पाणीसाठा असलेने पाटबंधारे विभागाने पाण्याचे काटकसरीचे नियोजन करणेबाबत कळविले आहे. शिंगणापूर बंधाऱ्याजवळ पाण्याची लेवल कमी होत असलेने त्याचा परिणाम पाणी उपसावर होत आहे. त्यामुळे शहराला पुर्ण क्षमतेने पाणी पुरवठा करणेसाठी एक दिवसआड पाणी पुरवठा करणे गरजेचे असलेचे सांगीतले.
स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव यांनी यावेळी बोलताना एक दिवसआड पाणी देणेऐवजी आठवडयातून एक दिवस पाणीपुरवठा बंद करता येते का ते पाहावे अशी सुचना केली
Leave a Reply