जल जागृती सप्ताहाची सांगता

 

कोल्हापूर Dot Photo_22_03_2016_01 : भविष्यात पाणी वापर क्षेत्र वाढणार आहे, यासाठी आधुनिक सिंचनक्षमतेचा पर्याय अनिवार्य असून 2030 पर्यंत सर्व घटकांसाठी पाणी मिळण्यासाठी जलजागृतीची चळवळ निरंतर राहिली पाहिजे, असे प्रतिपादन जलसंपदा विभागाचे निवृत्त प्रधान सचिव एकनाथ पाटील यांनी केले.

सुक्ष्मसिंचन, आधुनिक तंत्रज्ञान, कल्पक पिक पद्धतीद्वारे महाराष्ट्र समृद्ध करण्याचा महाराष्ट्र शासन दृढ संकल्प जलजागृती सप्ताह 16 ते 22 मार्च या कालावधीत आयोजिण्यात आला होता. या सप्ताहाच्या समारोप समारंभप्रसंगी  जलसंपदा विभागाचे निवृत्त प्रधान सचिव एकनाथ पाटील मार्गदर्शन करीत होते. यावेळी कृषि विभागाचे सहसंचालक डॉ. नारायण शिसोदे, जलसंपदा यांत्रिकी मंडळाचे विभागाचे अधीक्षक अभियंता मि. स. जिवने, उभारणी मंडळाचे अधीक्षक अभियंता श्री. कोष्टी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बसवराव मास्तोळी, कोल्हापूर महानगरपालिकेचे उपायुक्त विजय खोराटे, कार्यकारी अभियंता, अजय इनामदार आदि यावेळी उपस्थित होते.

जलसंपदा विभागाचे निवृत्त प्रधान सचिव एकनाथ पाटील मार्गदर्शन करताना म्हणाले, नदीतून उचललेले पाणी जनतेपर्यंत पोहोचवितांना होणारे जलप्रदुषण टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना प्राधान्यक्रमाने हाती घेणे गरजेचे आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र पाहता 7 लक्ष 68 हजार 500 हेक्टर क्षेत्रापैकी 7 लक्ष 22 हजार हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. यामध्ये साडेतीन लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आहे. जिल्ह्यास 110 टीएमसी स्थीर राहणार आहे. त्यामुळे पाणी नियोजन, पाण्याची बचत, कार्यक्षम पाणीवापर, ग्रुप ठिबक सिंचन, पाणी स्त्रोतांचे संवर्धन या बाबींचा विचार केल्यास उत्पादकता वाढू शकेल, अधिक वाढीव क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी काटेकोर नियोजन ही भविष्याची गरज राहणार असल्याचेही त्यांनी सांगित

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!