
मुंबई : पश्चिम विदर्भात आणेवारीच्या अहवालानुसार 4700 गावं दुष्काळी जाहीर करण्याचे आदेश हायकोर्टाने सरकारला दिले होते. मात्र, या गावांना दुष्काळग्रस्त घोषित करणे शक्य नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय.
अमरावतीच्या विभागीय आयुक्तांनी पश्चिम विदर्भात 4700 गावांत आणेवारी 50 टक्क्यापेक्षा कमी असल्याचा अहवाल दिला होता. पण,पश्चिम विदर्भातील 4700 गावांना दुष्काळग्रस्त घोषित करणे शक्य नाही. याबद्दल हायकोर्टाच्या आदेशाला आव्हान देऊ अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलीय. एनडीआरएफच्या मार्गदर्शक तत्वांनुसारच गावांमध्ये दुष्काळग्रस्त स्थिती घोषित करण्यात आल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिलंय
Leave a Reply