स्थायी समिती सभापती बेटिंग प्रकरणी पोलिसांच्या जाळ्यात

 

कोल्हापूर – महानगरपालिकेचे स्थायीIMG_20160326_223501 समिती सभापती मुरलीधर जाधव यांच्यावर बेटींग प्रकरणी गुन्ह्याची नोंद झाली आहे. काल पाकिस्तान आणि आस्ट्रेलिया सामन्या दरम्यान पोलिसांनी कोल्हापुरातील सम्राटनगर इथे छापा टाकून या क्रिकेट सामन्यावर बेटिंग लावणारे तेजू महाडीक आणि अमित बुकशेट यांना मुद्देमालासह अटक केली. तसेच त्यांच्याकडून रोख ६६ हजार रुपये, लॅपटॉप, मोबाईल संचही जप्त केला.

 

पोलिसांनी या दोघांकडे अधिक चौकशी केली असता, आपण नगरसेवक मुरलीधर जाधव आणि अन्य व्यक्तींच्या सागण्यावरुन बेटींग घेत असल्याचे पोलिसांना सांगितले. मुरलीधर जाधव हे राष्ट्रवादी पक्षाचे नगरसेवक असून गेल्या वर्षी विरोधी पक्ष नेता असतानाही बेटिंग प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. आता पुन्हा मुरलीधर जाधव बेंटिगमध्ये अडल्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेत खळबळ उडाली आहे.शहर पोलिस अधीक्षक भरतकुमार राणे यांनी ही कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!