क्षयरोगाला रोखण्यासाठी वेळीच निदान व् नियमित औषद्योपचारांची गरज :आरोग्य उपसंचालक

 

कोल्हापूर :  क्षयरोगाला रोखण्यासाठी वेळीच निदान, नियमित औषद्योपचार याबाबींवर अधिक लक्ष देऊन सर्वजण मिळून क्षयरोग संपवूया, असे आवाहन आरोग्य उपसंचालक डॉ. आर.बी. मुगडे यांनी बोलतांना केले.

IMG_20160323_150431जागतिक क्षयरोग दिन व क्षयरोग जनजागरण सप्ताहा निमीत्त जिल्हा क्षयरोग केंद्र, सी.पी.आर हॉस्पिटल व  शासकीय वैद्यकिय मेडिकल कॉलेज कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.एस. आडकेकर, उपअधिष्ठाता डॉ. देशमुख,  प्रभारी जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. एल.  एस. पाटील, एडस जिल्हा कार्यकम अधिकारी दिपा शिपूरकर, टीबी व उरोरोग विभाग प्रमुख डॉ. अनिता सैबन्नावर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षला वेदक,  वैद्यकिय अधिकारी डॉ. आर.एस.भाट  यांच्यासह अनेक मान्यवर तसेच डॉक्टर्स व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते..

प्रारंभी क्षयरोग जंतू शोधणारे नोबेल पारिताषिक विजेते डॉ. रॉबर्ट कॉक्स यांच्या प्रतिमेचे पूजन उपंसचालक डॉ. मुगडे यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ अनिता सैबन्नावर यांनी प्रस्तावना केली व डॉ. हर्षला वेदक यांनी सर्वाना टीबी उच्चाटनाबाबत शपथ दिली. सर्वजण मिळून टीबी संपवूया, जागतिक क्षयरोग दिनाचे घोषवाक्य नूसार टीबी निमुलनामध्ये सर्वाचा सहभाग असावा असे मत डॉ. मुगडे यांनी व्यक्त केले. टीबी वरील पथनाटय जिल्हा एडस् नियंत्रण कार्यक्रममार्फत सादरीकरण करण्यात आले. यावेळी डॉ सी.जे.शिंदे यांनीही आपले  मनोगत व्यक्त केले.

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त क्षयरोग प्रबोधन रॅली शहरातून काढण्यात आली. या रॅलीस सी.पी.आर हॉस्पिटल पासून सुरुवात झाली पुढे दसरा चौक-बिंदू चौक-शिवाजी पुतळा मार्गे परत सी.पी.आर मध्ये या रॅलीचा समारोप करण्यात आला.  या रॅलीचा शुभारंभ उपसंचालक डॉ. मुगडे व डॉ. देशमुख यांनी हिरवा झेंडा दाखवून केला. प्रबोधन रॅली मध्ये सहभागी झालेले श्री.हरीहर हायस्कुल, श्री.साई हायस्कुल, नेहरु हायस्कुल-जुनिअर कॉलेज, नुतन मराठी हायस्कुल, दादासाहेब अ. मगदूम हायस्कुल कोल्हापूर यांना मान्यवर पाहुण्याच्या हस्ते प्रशस्तीपञ देऊन गौरवण्यात आले. तसेच नर्सिग कॉलेज, आरोग्य सेवक प्रशिक्षण वर्ग, ब्रम्हाकुमारी इश्वरीय विश्व विद्यालय तसेच चाय व विहान एनकेपी प्लस आदि सामाजिक संघटना यांचा सहभाग झाले होते. डॉ.भाट यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!