
कोल्हापूर :कॉम्रेड गोविंदराव पानसरे हत्येप्रकरणी आज जिल्हा सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीत फिर्यादी पानसरे कुटुंबियांचे वकील विवेक घाटगे यांनी सरकारी वकिलांवरच व तपासयंत्रणा याच्यावर नाराजी व्यक्त केला,पोलीसच्या हत्या प्रकरणी तपासात बाबत हि त्यांनी नाराजी न्यायालयात मांडली आजच्या सुनावणीला तपास अधिकारी उपस्थित राहणे गरजेचे असताना ते न आल्याने तापसबाबतची प्रगती समजणे शक्य होणार नसून त्यामुळे आरोपीला पोषक वातावरण निर्माण होण्याची भिती त्यांनी व्यक्त केली घाटगे यांनी मांडलेल्या या युक्तिवादामुळे सरकारी वकील चंद्रकांत बुधले आणि घाटगे यांच्यातच जुंपली तर या दोघात नसलेला ताळमेळ समीर निर्दोष असल्याचे स्पष्ट करत असून समीर वर आरोप निश्चित करून या खटल्याचा निकाल लवकर लावण्याची मागणी समीर चे वकील समीर पटवर्धन यांनी केली तर सरकारी वकीलानीही 4 एप्रिल ला होणाऱ्या सुनावणीत जर समीर ची बाजू योग्य वाटली तर आरोप निश्चित करण्यास परवानगी देऊ असे सरकारी वकील बुधले यांनी सांगितल्याने पानसरे कुटुंबीय मात्र नाराज झाले आहे तपास अद्याप अपूर्ण असून इतक्यात आरोप निश्चित करणे घाईचे ठरणार असल्याचं मेघ पानसरे यांनी सांगितलं आहे या प्रकरणी पुढील सुनावणी 4 एप्रिल ला होणार असून या सुनावणीसाठी संशयित आरोपी समीर गायकवाड ला उपस्थित ठेवण्याची परवानगी कोर्टाने आज दिली आहे
Leave a Reply