फेरीवाला महापालिका पदाधिकारी, अधिकारी यांची बैठक निष्फळ

 
फेरीवाला महापालिका पदाधिकारी, अधिकारी यांची बैठक निष्फळ
कोल्हापूर 20151214_213947-BlendCollage– राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार फेरीवाल्यांचे पुनर्वसन करणेच्या कारवाईबाबत आज महापालिका पदाधिकारी व अधिकारी यांची संयुक्त बैठक छ.ताराराणी सभागृहात संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महापौर सौ.अश्विनी रामाणे होत्या.
प्रारंभी अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक संजय भोसले यांनी फेरीवाला धोरणाची अंमलबजावणीसाठी करणेत आलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. यामध्ये फेरीवाला झोनबाबत चारही विभागीय कार्यालयात संबधीत नगरसेवक व त्या क्षेत्रातील फेरीवाल्यांची संयुक्त बैठक घेवून फेरीवाला क्षेत्रात येणाऱ्या ठिकाणांच्या संबधाने आलेल्या हरकती आणि त्यावर देणेत आलेले पर्याय याबाबतची माहिती दिली. या बैठकीमध्ये सुचविण्यात आलेल्या पर्यायामधून काही बदल मान्य करण्यात आले आहेत. तर काही ठिकाणी बदल करणे शक्य नाही. जसे मिरजकर तिकटी दुधकट्टा ते केशवराव भोसले नाटयगृह या ठिकाणी रस्ता अरुंद असलेने तसेच नाटयगृह नुतनीकरणाचा दुसरा टप्पाचे काम अंतिम मंजूरीत असल्याने सदर ठिकाणी पुर्नवसन करणे अडचणीचे होणार आहे असे सांगितले. त्यामुळे सदरचा प्रस्तावीत रस्ता वगळणेत आला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!